वाशिम - कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये, म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून सर्वत्र पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. मात्र 31 मार्चपूर्वी पीककर्जाचा हप्ता भरला तर व्याज लागणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली असून बँकासमोर लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून बँकेसमोर गर्दी टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
पीककर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकासमोर लांबच लांब रांगा..
31 मार्चपूर्वी पीककर्जाचा हप्ता भरला तर व्याज लागणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली असून बँकासमोर लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. मात्र यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.