ETV Bharat / state

मातोश्री समोर आत्मदहनाची परवानगी द्या, वाशिम जिल्ह्यातील रुग्णांची मागणी

वाशिम मधील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाकडून जास्तीची रक्कम वसूल केल्याचा आरोप केला जात आहे.

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल

author img

By

Published : Feb 20, 2021, 3:24 PM IST

Updated : Feb 20, 2021, 3:36 PM IST

वाशिम - वाशिम मधील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल केल्याचा आरोप केला जात आहे. येथे उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांना रक्कम परत केली आहे. मात्र शिरपूर आणि वाघी येथील रुग्णांना रक्कम परत मिळाली नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. 31 मार्च पूर्वी आम्हाला रक्कम परत मिळाली नाही. तर मातोश्री समोर आत्मदहनाची परवानगी रुग्णांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे.

वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल

31 मार्चला आत्मदाहणाचा इशारा-

वाशिम जिल्ह्यात ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाने एका खासगी रुग्णालयात 100 खाटाची परवानगी दिली होती. मात्र या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून अधिकचे रक्कम वसूल केल्याचा तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमून काही रुग्णांना पैसे परत केले आहेत. मात्र शिरपूर येथील बालाजी कदम तर वाघी येथील भीमराव कव्हर याना रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे रक्कम परत मिळाली नाही तर मातोश्री समोर 31 मार्चला आत्मदाहनाचा इशारा या रुग्णांनी दिला आहे.

कोरोना रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल-

हॉस्पिटलमध्ये शिरपूर येथील बालाजी कदम यांनी उपचार घेतले. त्यांच्याकडून 2 लाख 55 हजार रुपये बिल घेण्यात आले. तर वाघी येथील भीमराव कव्हर यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्यावरही त्यांच्याकडून 3 लाख 68 हजार रुपये वसूल केले आहेत. यांच्याकडून जास्तीची वसूल केलेली रक्कम परत 31 मार्च पर्यंत द्यावी अन्यथा मातोश्री समोर आत्मदहन करण्याची परवाणगी या रुग्णांनी मागितली आहे.

हेही वाचा- इंधन दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त, जाणून घ्या विविध जिल्ह्यातील दर

Last Updated : Feb 20, 2021, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.