वाशिम - जिल्ह्यातील चिंचबापेन येथील मदन किसन वानखडे या शेतकऱ्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतात फवारणी करत असताना ही घटना घडली.
मदन वानखेडे (40) त्यांच्या शेतात फवारणी करत होते. फवारणी करत असताना तुटलेल्या वीज जोडणी तारेला त्यांच्या स्पर्श झाला. यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात मदन वानखडे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आणला.