वाशिम - उन्हाळी हंगामाच्या मध्यंतरीच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या नदीपात्रात लागवड केलेली खरबूज, काकडी, टरबुजाची पिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या पिकातून उत्पादनाची आशा नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी या पिकात गुरे चराईसाठी सोडली आहेत.
यावर्षी उन्हाळ्याची चाहुल लागताच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे या नदीपात्रातील शेतकऱयांच्या बहरलेल्या फळपिकांवर मोठे संकट आले. शेतकऱ्यांनी कशीबशी नदीपात्रातील पाण्याच्या आधारे ही पिके वाढवली. त्यापासून जेमतेम उत्पादनही झाले. मात्र, खर्च वसुल झाला नाही. आता नदीपात्रातून पिके जगविणे कठीण झाले आहे. फळपिके सुकत चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांमध्ये गुरांना मोकळे सोडले आहे.