वाशिम - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे या सरकारच्या गळतीला सुरुवात झाली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. वाशिममध्ये अनसिंग आणि शिरपूर जैन येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
हेही वाचा - सावित्रीबाई फुले जयंती : वाशिममध्ये महिलांनी काढली बाईक रॅली
यावेळी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामासाठी झाले नसून, मलई खाण्यासाठी झाले आहे. आधी विस्तार झाला नाही. तर आता खातेवाटप झाले नाही. त्यामुळे सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. यापुढे हे सरकार असेच जाईल, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
हेही वाचा - चक्क स्मशानभूमित वाढदिवस केला साजरा, हे आहे कारण