ETV Bharat / state

आरटीपीसीआर नमुने तत्काळ पाठविण्यास सुरुवात

नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच आरोग्य विभागाला जाग आली आहे. यानंतर घेतलेले आरटीपीसीआर चाचणीचे नमुने तपासणीसाठी लॅबवर तत्काळ पाठविण्यात सुरुवात झाली आहे.

वाशिम
वाशिम
author img

By

Published : Mar 3, 2021, 10:19 PM IST

वाशिम - मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 'आरटीपीसीआर'च्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्त्रावाचे नमुने जास्त दिवस पडून आहेत. त्या नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच आरोग्य विभागाला जाग आली आहे. यानंतर घेतलेले आरटीपीसीआर चाचणीचे नमुने तपासणीसाठी लॅबवर तत्काळ पाठविण्यात सुरुवात झाली आहे.

वाशिम
वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना रुग्णांची संख्येत दररोज होत असलेली वाढ पाहता कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी नागरिक कोरोना तपासणी करत आहेत. मात्र, कोरोना तपासणी केलेल्या नागरिकांची अनेक दिवस उलटूनही अहवाल येत नाहीत आणि नंतर कळते की नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाली आहे. या घटनेला बघता जिल्हा प्रशासन जागे झाले असून आता तपासणीचे नमुने आज पहाटेच मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने तपासणीसाठी वाशिम येथे प्रयोगशाळेत पाठविले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.