ETV Bharat / state

कारंजा बसस्थानकात बेवारस महिलेचा मृतदेह; कोरोनाच्या भीतीने नागरिकांची गाळण

कारंजा बस स्थानकात आज सकाळी एक वृद्ध महिला मृतावस्थेत आढळली. अन्न न मिळाल्याने या वृद्धेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

karanja bus station
कारंजा बसस्थानकावर बेवारस महिलेचा मृतदेह
author img

By

Published : May 21, 2020, 11:02 AM IST

Updated : May 21, 2020, 1:45 PM IST

वाशिम - कारंजा बस स्थानकात आज सकाळी एक वृद्ध महिला मृतावस्थेत आढळली. अन्न न मिळाल्याने या वृद्धेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संबंधित महिलेला मृतावस्थेत बघून कोरोनाच्या भीतीने अनेकांनी याकडे काणाडोळा केला. याच वेळी कारंज्यातील श्याम सवाई यांनी घटनास्थळी जाऊन वृद्धेच्या नातेवाईकांचा शोध सुरू केलाय.

कारंजा बसस्थानकावर बेवारस महिलेचा मृतदेह

मृताचे नाव कमला मोडक असून ती बेल मंडळ येथील मूळनिवासी आहे. मागील काही दिवसांपासून ती बसस्थानक परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. वृद्धेचा मृत्यू अन्न न मिळाल्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अद्याप कारण अस्पष्ट आहे. मात्र बेवारस मृतदेह सापडल्याने बसस्थानक परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. बराच वेळ हा मृतदेह जागीच पडून होता. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : May 21, 2020, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.