वाशिम - जिल्ह्यात मागील दोन दिवसात मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यात परिसरातील सोयाबीन, कपाशी, तूर, हळद पिकांत पाणी साचले आहे. त्यामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तालुक्यात यावर्षी 60 हजार हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी झाली असून यात सर्वाधिक 47 हजार हेक्टर पेरा हा सोयाबीनचा आहे. सततच्या पावसामुळे हे सोयाबीन धोक्यात आले आहे. तसेच कपाशी, हळदीच्या पिकांत पाणी साचल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कृषी विभागाच्यावतीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यात उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. कृषी विभागाने गंभीर बाबींकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - सोयाबीनच्या शेंगांना फुटले अंकुर, शेतकऱ्याचे अतोनात नुकसान