ETV Bharat / state

सरकार बोलघेवडे नसून करणारे आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरकार बोलघेवडे नसून करणारे आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना मारला.वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेती विषयक सर्वकाही माहिती मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत कृषी संकुलाची उभारणी केली जाणार आहे. वाशिम येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ई-भूमी पूजन सोहळा रविवारी (दि. 15 ऑगस्ट) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

d
d
author img

By

Published : Aug 15, 2021, 8:25 PM IST

Updated : Aug 15, 2021, 8:39 PM IST

वाशिम - सरकार बोलघेवडे नसून करणारे आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना मारला. ते पुढे म्हणाले, कोरोना काळात या देशाला शेतकऱ्यांनी तारले आहे. शेतकऱ्यांना वर्क फॉर होम करता येत नाही. शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकवा, सात बारा घरपोच मिळवण्याची सोय झाली आहे. सातबारा समजेल असा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सॅटेलाईटद्वारे ई-पिक पाहणी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

सरकार बोलघेवडे नसून करणारे आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेती विषयक सर्वकाही माहिती मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत कृषी संकुलाची उभारणी केली जाणार आहे. वाशिम येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ई-भूमी पूजन सोहळा रविवारी (दि. 15 ऑगस्ट) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, आमदार किरणराव सरनाईक, जिल्हा अधिकारी शन्मुखराजन, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची उपस्थिती होती. या संकुलामुळे उभे राहणार असल्याने वऱ्हाडातील कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

5 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च मंजूर

राज्यातील शेतकरी बांधवांच्या निवासस्थानापासून प्रक्रिया उद्योगापर्यंत सर्व सुविधा आणि शेतकरी बांधवांना प्रॅक्टिकल मार्गदर्शन या प्रकल्पामध्ये एकाच ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प 1.6 हेक्टरवर उभारला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटी 44 लाख रुपये खर्च मंजूर केला असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - वाशिममध्ये रस्ते कामात कोणताच अडथळा नाही, स्वतः गडकरींना पत्र लिहून कळविणार - शंभूराज देसाई

Last Updated : Aug 15, 2021, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.