वाशिम - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. यातच जिल्ह्यातील अंध विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या दिव्यांग मुलांनी केले आहे. यासाठी त्यांनी वाद्यवृंदासह सादरीकरण केले. अंध चेतन उचीतकर यांनी गायनातून 'हेही दिवस जातील', असे सांगून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय.
केकतउमरा येथे 15 अंध मुला-मुलींचा चेतन सेवांकुर नावाचा सामाजिक प्रबोधनाचा गायन समूह असून त्यांचे देशभरात कार्यक्रम होत असतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून जनतेला भावनिक आवाहन केले आहे.