वाशिम- समृद्धि महामार्गाच्या कामावरील मजुरांचे मागील 3 महिन्यांचे पैसे रखडले आहेत. त्यामुळे ट्रक मालक, जेसीबी मालक चालक, सुपरवायझर, मेस मालक, पंचर काढणारे आदींनी बुधवारी या कंपनीच्या वारंगि बेस कॅम्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांचे कंपनीकडे कोटींची बिले थकीत आहेत .
या आंदोलना दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मध्यस्थी करून सदभावच्या मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अरविंद वलानी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी तीन दिवसात पैसे अदा करतो, असे सांगितल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
पोक्लन्ड- 5, टिप्पर-20, चालक-10, सुपरवायझर-8; पाईप लाईन दुरुस्ती करणारे- 3, मेसवाले -2, ट्रँक्टर- 1, पेयजल पुरवठादार -1, किरकोळ वाहन धारक- 1, पंचर काढणारे- 3, चहावाला -1 कार्यालयीन देखभाल करणारे-1 उपहारगृह वाला - 1, जनरल स्टोअर्स वाला - 1 या सर्वांचे कोटींचे जवळपास बिले थकीत आहेत.