वाशिम - शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्यास काही अवधी राहिला असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या पाठींब्यावर भाजपने सरकार स्थापन केले. या प्रकारामुळे उद्विग्न झालेल्या मानोरा तालुक्यातील उमरी येथील रमेश जाधव यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे अंगावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न रवीवारी केला. मात्र, सोबत असलेल्या शिवसैनिकांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात उपचार केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वाशिम जिल्ह्यातील उमरी खुर्द येथील रमेश जाधव हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. यंदा शिवसेनेचे सरकार येणार आणि शेतकरी कर्जमुक्त होणार असे असताना अचानक शनिवारी भाजपने सरकार स्थापन केले, त्यामुळं आता शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याच रमेश जाधव यांनी सांगितले.
खासदार भावना गवळी यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिक रमेश जाधव यांची भेट घेतली असून असा विचार मनात ही आणू नका असे आवाहन केले आहे. दरम्यान यावेळी भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.