वाशिम- 'महाराष्ट्रात आम्ही कलम 370 चा उल्लेख करीत आहोत. मात्र, काँग्रेस वाले म्हणतात, 'महाराष्ट्रात 370 चा काय सबंध'. यावर बोलताना, महाराष्ट्रातील जवान शहीद झाले नाहीत का?,असा प्रश्न उपस्थित करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस वर टीका केली.
हेही वाचा- शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर
'मागील पाच वर्षांत मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची यादी वाचायची असेल तर, सात दिवस भागवत सप्ताह ठेवावा लागेल,' असा दावा शाहा यांनी प्रचार सभेत केला आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. काश्मीरमधील घुसखोरांना 2024 पर्यंत एक-एक करून देशाबाहेर काढणार असल्याचेही यावेळी शाह म्हणाले.