ETV Bharat / state

मास्कचा वापर न करणाऱ्यांवर वाशिममध्ये होणार कारवाई - washim news today

दुकाने अथवा आस्थापनांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास, मास्कचा वापर न केल्यास संबंधित ग्राहकासोबतच आस्थापना मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.

षण्मुगराजन
षण्मुगराजन
author img

By

Published : Feb 16, 2021, 9:56 PM IST

वाशिम - जिल्ह्यात कोरोनासंसर्ग वाढू नये, यासाठी सर्व नागरिकांसह हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारपेठ, पेट्रोलपंप, मंगल कार्यालये यासारख्या आस्थापनाधारकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. दुकाने अथवा आस्थापनांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास, मास्कचा वापर न केल्यास संबंधित ग्राहकासोबतच आस्थापना मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या सभेत ते बोलत होते.

'मालकावरसुद्धा कारवाई'

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी. चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, पेट्रोलपंप, लग्न अथवा इतर समारंभ, खेळाची मैदाने यासह सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी मास्क न लावलेल्या व्यक्ती आढळल्यास संबंधित आस्थापना मालकावरसुद्धा कारवाई केली जाईल.

'त्रिसुत्रीचे पालन होणे आवश्यक'

सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तालुकास्तरावर सर्व आस्थापनाधारकांच्या संघटनांची बैठक घेवून त्यांना कोरोना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रीचे पालन होणे आवश्यक असून याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारकाची असणार आहे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.

'चाचण्यांची संख्या वाढवा'

कोरोनाबाधितांचा लवकर शोध घेवून त्यांना अलगीकरणात ठेवल्यास हा संसर्ग वाढणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्व तहसिलदारांनी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून सूक्ष्म नियोजन करावे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.