वाशिम- २००३ मध्ये एकतर्फी प्रेमातून शहरातील अर्चना शिंदे यांच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. या हल्ल्यात बचावलेल्या अर्चना शिंदे यांनी काल गोरगरीब मुलींना सवलतीच्या दरात छपाक सिनेमा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे, स्वतःवर झालेला अॅसिड हल्ला किती भयानक होता हे प्रत्येक शाळेत जाऊन त्या हल्ल्याची दाहकता त्या विद्यार्थ्यांसमोर सांगतात. अर्चना यांनी मल्टिप्लेक्स सिनेमागृहाच्या मालकांना विनंती करून ५० टक्के सवलतीच्या दरात २०० मुलींना छपाक सिनेमा बघण्याची व्यवस्था केली आणि काल मुलींनी सिनेमाही बघितला. स्त्री सुरक्षेबाबत मुलींना जागृत करण्याची अर्चनाची मोहीम ही अत्यंत प्रेरणादायी आणि वाखण्याजोगी आहे.
हेही वाचा- खड्डयामुळे संपले असते त्याचे कुटुंब, महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी तो बनला रोडमॅन