वाशिम - विनापरवाना देशी कट्टा व ६ जिवंत काडतुस वापरणाऱ्या वसिम ऊर्फ रहिमगुल खान पठाण नझर खान पठाण (वय २७) या आरोपीला हिवरा रोहिला येथील उर्दू शाळेजवळून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हिवरा रोहिला येथील वसीम ऊर्फ रहिमगुल खान पठाण नझर खान पठाण हा विनापरवाना पिस्तुल (देशी कट्टा) वापरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्याआधारे २ पोलिसांचे चमू तयार करून सापळा रचला, आरोपी वसीम हा हिवरा रोहिला येथील उर्दू शाळेजवळ आढळून येताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.