वाशिम - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मात्र, नागरिक याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीत. लॉकडाऊन असतानादेखील अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. शेवटी पोलीस प्रशासनला विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी लागत आहे.
यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील संतोष डोंगरे यांनी आपल्या कलेचा वापर केला आहे. त्यांनी पु्ठ्ठ्यापासून लॉकडाऊन बंगला तयार केला आहे. याच्या माध्यमातून घरीच राहून लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे..