वाशिम - हैदराबाद येथील रुद्रमनी शिवकुमार हा तीन वर्षीय मुलगा एका हॉटेल समोर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते. ही घटना 8 फेब्रुवारीला घडली होती. अपहरण झालेल्या मुलाला शोधण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी अपहरणकर्ता शाम सोळंकी यास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - वन मंत्री संजय राठोडांसंदर्भात पोहरादेवी येथे चार महंत आज घेणार पंचायत
मुलाच्या अपहरणाची तक्रार अबीट पोलीस स्टेशन, हैदराबाद येथे दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पळवून नेलेल्या रुद्रमणी शिवकुमारचा शोध घेत हैद्राबादचे पोलीस पथक काल मालेगावात दाखल झाले होते. पोलिसांनी मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेवून अमनवाडी रेल्वे स्टेशन व आजूबाजूच्या परिसरात मुलाचा शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. दोन्ही पथके परत मालेगाव येथे आले.
आज मालेगाव पोलिसांना मुलाबाबत माहिती मिळाली. त्यांना अमनवाडी येथील शाम सोळंकी याच्याकडे मुलगा मिळून आला. अपहरण करणाऱ्या शाम सोळंकीला पोलिसांनी अटक केली असून, अपहरण झालेल्या रुद्रमनीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहे.
हेही वाचा - वाशिम : मास्क न घालणाऱ्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई