वाशिम - 'आई' या शब्दात फक्त 'नि:स्वार्थ प्रेम आणि वात्सल्य' सामावलेले असते, याचे उदाहरण वाशिम जिल्ह्यामध्ये पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सुरकंडी येथे काही दिवसांपूर्वी व्यायलेली गाय मेल्याने पोरके झालेल्या एका वासराला कुत्री दूध पाजते आहे.
हेही वाचा... हिंगोलीत परतीच्या पावसाचा धुमाकुळ, कपाशीला मोठा फटका
वाशिम जिल्ह्यातील सुरकंडी येथील हबूब बेनिवाले यांच्या गाईने दोन महिन्यांपूर्वी एका वासराला जन्म दिला. ही गाय 8 दिवसांपूर्वी मरण पावली. याच दरम्यान त्यांच्या पाळीव कुत्रीनेही दोन पिलांना जन्म दिला, मात्र ती पिले मरण पावली. या आई असलेल्या कुत्री आणि वासराचा एकमेकांना लळा लागला, गट्टी जमली. यानंतर ही कुत्री या गाईच्या वासराला आपले दूध पाजत आहे. दिवसभरातून साधारणतः 3 वेळा ही कुत्री गाईच्या वासराला आपले दूध पाजत आहे.
हेही वाचा... शिवाजी महाराजांचा आधुनिक 'प्रपातगड',नागपुरात दिवाळीनिमित्त काल्पनिक किल्ल्याचे प्रात्यक्षिक