ETV Bharat / state

40 फूट खोल विहिरीत पडलेल्या 75 वर्षीय आजीबाईंना जीवदान - कारंजा वृद्ध महिला जीवदान बातमी

अर्धांगवायू झालेल्या 75 वर्षीय विमल चौधरी या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन संस्था यांनी प्रयत्न करून आजीबाईंना सुखरूप बाहेर काढले व त्यांचा जीव वाचवला.

Karanja old woman rescued from well
कारंजा वृद्ध महिला जीवदान बातमी
author img

By

Published : May 3, 2021, 9:38 AM IST

वाशिम - कारंजा शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात एक 40 फूट खोल विहीर आहे. अर्धांगवायू झालेल्या 75 वर्षीय विमल चौधरी या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. याची माहिती सर्वधर्म आपत्कालीन संस्थेला देण्यात आली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन संस्था यांनी प्रयत्न करून आजीबाईंना सुखरूप बाहेर काढले व त्यांचा जीव वाचवला.

विहिरीत पडलेल्या 75 वर्षीय आजीबाईंना जीवदान

कारंजा उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 75 वर्षीय आजी विहिरीत पडल्यानंतर त्यांनी विहिरीत असलेल्या मोटारपंपचा पाईप धरून ठेवला होता त्यामुळे त्या पाण्यात बुडाल्या नाहीत. परिणामी त्यांचा जीव वाचविणे शक्य झाले, अशी माहिती एका गावकऱ्याने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.