ETV Bharat / state

रिसोड तालुक्यात एकाच रात्री 50 सोयाबीनच्या सुड्यांना आग, साडेसात लाखाचे नुकसान

तिसऱ्या घटनेत गणेश बोरकर यांच्या पाच एकर शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लागल्याने सव्वा लाखाचे नुकसान तर चौथ्या घटनेत भानुदास भुतकर यांच्या अडीच एकर शेतातील सोयाबीनचा सुडीला आग लागलेले 50 हजाराचे नुकसान झाले.

author img

By

Published : Oct 28, 2020, 7:34 PM IST

50 soybean husks caught fire in one night causing loss of rs 7 lakh  in risod taluka at washim
रिसोड तालुक्यात एकाच रात्री 50 सोयाबीनच्या सुड्यांना आग

वाशिम - रिसोड तालुक्यातील कोयाळी खुर्द येथील चार शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा सुड्यासह एक गोठा तसेच गोवर्धन येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लागून सुमारे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले.

कोयाळी खुर्द किशोर पोंगे यांच्या शेतातील आठ एकरमधील सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या सुडीला आग लागून अडीच लाखांचे व आगीमध्ये गोठा जळाल्याने एक लाख रुपये असे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. गजानन बोरकर यांच्या चार एकर शेतातील सोंगणी केलेल्या सोयाबीनचा सुडीला आग लागून एक लाखाचे नुकसान झाले.

तिसऱ्या घटनेत गणेश बोरकर यांच्या पाच एकर शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लागल्याने सव्वा लाखाचे नुकसान तर चौथ्या घटनेत भानुदास भुतकर यांच्या अडीच एकर शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लागून 50 हजाराचे नुकसान झाले.

पाचव्या घटनेत गोवर्धन येथील वसंता अंभोरे यांच्या पाच एकर शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लागून सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले. पाच घटनांमध्ये साडेसात लाख रुपयाचे नुकसान झाले. सदर घटनांची तक्रार शिरपूर पोलिसांत केली असून आग कोणी लावली, याचा तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.