वाशिम - कारंजा नगर पालिकेतील विद्यमान भारिपचे 19 नगरसेवक तसेच, मानोरा नगर पंचायतीचे 4 नगर सेवक व माजी नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी मो. युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा- Washim : लस घेतल्याचे प्रमाणपत्र असेल तरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश
आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमांतर्गत माजी जि.प. सभापती वाशीम व माजी नगराध्यक्ष हेमेन्द्र ठाकरे, कारंजा नगर परिषद उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, सत्ताधारी गटनेते व सभापती अॅड. फिरोज शेकूवाले, नगरसेवक सलीम गारवे, अ. एजाज अ. मन्नान, चांद शाह, जावेद्दोदिन शेख, इरफान खान, जाकीर शेख, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, अब्दुल राशीद, जाकीर अली, आरिफ मौलाना, सैय्यद मुजाहिद, निसार खान, डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, सोहेल अन्सारी, अब्दुल बशीर, शेषराव राठोडसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी वाशीम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, पक्ष निरीक्षक संजय रोडगे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, बाबाराव खडसे, सोनाली ठाकूर, अशोक परळीकर, प्रवीण कुंटे, जावेद हबीब, मतीन कामले, सुनील पाटील, वाहिदोद्दीन शेख, प्रशांत गोळे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा- Washim School Reopen : शहरी व ग्रामीण भागातील पहिली ते चवथीच्या शाळा उत्साहात सुरू