ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात एका आठवड्यात म्युकरमायकोसिसचे 10 रुग्ण; तिघांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार मोठ्या प्रमाणात होत आहे. वाशिममध्येही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 10 रुग्ण आढळले असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

mucormycosis symptoms ,  mucormycosis washim ,  washim mucormycosis patients ,  वाशिम म्युकरमाकोसिस ,  म्युकरमायकोसिस पेशंट वाशिम ,  म्युकरमायकोसिस लक्षणे
म्युकरमायकोसिस
author img

By

Published : May 16, 2021, 7:11 AM IST

वाशिम - जिल्ह्यात कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराची लागण होत असल्यानं रुग्णांमध्ये भीती पसरली आहे. जिल्ह्यात या आठवड्यात एकूण 10 रुग्ण आढळले असून यातील 9 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले होते. तर एक 62 वर्षीय महिला शासकीय लेडी हार्डिंगमध्ये भरती होती. तिचा उपचारा दरम्यान 12 मे रोजी मृत्यू झाला आहे. तर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इतर दोन रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. तसेच खासगी रुग्णालयात 9 रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत.

म्युकरमायकोसिस या आजाराने एक महिन्यांपूर्वी मालेगाव येथील 85 वर्षीय महिला तर गोहगाव येथील 70 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात इतर खासगी रुग्णालयात 9 रुग्ण असून, बेदरकर हॉस्पिटलमध्ये 3 रुग्णांनी म्युकरमायकोसिसवर उपचार घेतले आहे. आजार जरी गंभीर असला तरी रुग्ण लवकर डॉक्टरांकडे आले तर आजार बरा होत असल्याची माहिती डॉ. बेदरकर यांनी दिली.

म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल माहिती देताना डॉ. संतोष बेदरकर...

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत असून, यावर लागणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन औषधं रुग्णाच्या वाढीनुसार उपलब्ध करण्याचं नियोजन करावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. दरम्यान यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांना विचारले असता त्यांनी खासगी रुग्णालयाची माहिती नसल्याचं सांगितलं.
हेही वाचा - अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची दस्तक, ग्रामीण भागात दोन रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.