ETV Bharat / state

जागतिक कुटुंबंदिन : मानधन नसल्याने संगणक परिचालकाचे चिमुकल्या मुलींसह सहकुटुंब उपोषण - आष्टी

जागतिक कुटुंबंदिनीच सहकुटुंब उपोषणावर बसण्याची वेळ एका संगणक चालकावर आली आहे. आष्टी तालुक्यातील बोरगाव टूमणी येथील ग्रामपंचायतीतील संगणक चालकाने मानधनासाठी महिला सरपंचाच्या विरोधातच उपोषणाचे हत्यार उपसले असून तो आष्टी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहेत.

सहकुटुंब उपोषण
author img

By

Published : May 16, 2019, 10:22 AM IST

वर्धा - आष्टी शहीद येथील धक्कादायक प्रकार म्हणजे जागतिक कुटुंबंदिनीच सहकुटुंब उपोषणावर बसण्याची वेळ एका संगणक चालकावर आली आहे. आष्टी तालुक्यातील बोरगाव टूमणी येथील ग्रामपंचायतीतील संगणक चालकाने मानधनासाठी महिला सरपंचाच्या विरोधातच उपोषणाचे हत्यार उपसले असून तो आष्टी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहेत. पंकज पोटपीटे असे या संगणक चालकाचे नाव असून तो पत्नी आणि चिमुकल्यांना घेऊन उपोषणाला बसला आहे.

सहकुटुंब उपोषण

पंकज पोटपीटे हा पोटाची खळगी भागवण्यासाठी ग्रामपंचायतीत 2011 पासून संगणक परिचालक म्हणून काम करत आहेत. 2017 मधील ग्रामसभेच्या ठरावानुसार पुन्हा तो जानेवारी 2018 पासून बोरगाव तटूमनीला काम करत आहे. विद्यमान महिला सरपंचांनी चपराशाला सांगून त्याला संगणक परिचालकाचे काम करण्यास मज्जाव केला आहे. तसेच त्याला कार्यालयात जाऊ न देण्याचा सरपंचांचा तोंडी आदेश असल्याचे उत्तर पंकजला देत असल्याचे संगितले जात असल्याचा आरोप पंकज पोटपिटेने निवेदनातून केला आहे.

पंकजने जागतिक कुटुंबंदिनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रश्नासनाला दिला होता. पण याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले. अखेर पंकज पत्नी आणि चिमुकल्या मुलींसह उपोषण सुरू केले. आज पहिल्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेने दखल न घेऊन निगरगट्टपणा दाखवला आहे. विशेष म्हणजे याची माहिती विस्तार अधिकारी वानखडे यांनासुद्धा असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.

पत्र देऊन प्रकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच....

या प्रकरणात जिल्हा परिषदकडेसुद्धा सुनावणी झाल्याचे पंकजने सांगितले आहे. मागील दीड वर्षपासून यासाठी लढा देत असल्याचे पंकज सांगतो. काहीच मार्ग न निघत असल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसल्याची माहिती पंकजने दिली.

मागील 11 महिन्याचे मानधन मिळाले नाही......

पंकज हा संगणक परिचालक म्हणून मिळणाऱ्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करतो, अशा परिस्थितीत आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे तो सांगतो. त्यामुळे पंकजने उपोषणाचे हत्यार उपसले. मात्र गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांना त्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

सरपंचांना अनेक कामात भ्रष्टाचाराला अडथळा होत असल्याने आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही पंकजने केला आहे. मात्र यावर अनिता ढोले यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांची बाजू कळू शकली नाही.

संगणक परिचालक संघटनेचा उपोषणाला पाठींबा

सरपंचाविरोधात उपोषण सुरू केल्यानंतर पंकजला संगणक परिचालक संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यासह काम बंदचा इशाराही संघटनेने दिला आहे. त्यामुळे याचा फटका इतर ग्रामपंच्यातीवर पडण्याची शक्यता आहे. यात सुरवातीला काही लोकांनी कामबंद केले असून प्रश्न मार्गी न लागल्यास इतरही ठिकाणी काम बंद करण्याचा इशारा संघटनेने निवेदनातून केला आहे.

Intro:वर्धा
R_MH_15_MAY_WARDHA_UPOSHAN_VIS_1
व्होज्वल बाईट सोबत जोडला आहे.

जागतिक कुटुंबंदिन- सहकुटुंब उपोषणाला सुरवात, चार वर्षाच्या मुलीसह 8 महिन्याचा चिमुकलीचा समावेश

- 11 महिण्यापासून मानधन नसल्याने उपासमार
- प्रशासनाही डोळेझाक, पत्रव्यवहार करुन न्याय नाही
- संगणक परिचालक संघटनेचा पाठिंबा काम बंदच इशारा

वर्ध्याच्या आष्टी शाहिद येथील धक्कादायक प्रकार म्हणजे जागतिक कुटुंबंदिनी सहकुटुंब उपोषणावर बसण्याची वेळ संगणक चालकावर आली. आष्टी तालुक्यातील बोरगावं टूमणी येथील ग्रामपंचायत मधील संगणक चालकाने सहकुटुंब मानधनासाठी उपोषण सुरू केले. महिला सरपंचाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसत आष्टी पंचायत समिती कार्यल्यासमोर उपोषणाला सुरवात केली आहे. पंकज पोटपीटे असे संगणक चालकाचे नाव असून पत्नी आणि दोन मुलांना घेऊन बसला आहे.

पंकज पोटपीटे हा पोटाची खळगी भागवण्यासाठी ग्रामपंचायतला 2011 पासून संगणक परिचालक म्हणून काम करत आहे. 2017 मधील ग्रामसभेच्या ठरावानुसार पुन्हा तो जानेवारी 2018 पासून बोरगाव तटूमनीला काम करत असून संसाराचा गाडा चालवत आहे. दरम्यान विद्यमान महिला सरपंच यांनी चपराश्याला सांगून संगणक परिकचालकाचे काम करण्यास मज्जाव केला आहे. तसेच कार्यालयात गेले असताना जाऊ न देता सरपंच यांचे तोंडी आदेश असल्याचे उत्तर पंकजला देत असल्याचे संगीतले जात असल्याचा आरोप पंकज पोटपिटे याने निवेदनातून केला आहे.

यावर पंकज यांनी जागतिक कुटुंबंदिनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रश्नासनाला दिला होता. पण याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष करत गलथान कारभार दाखवला नाही तरच नवल. अखेर पंकज पत्नी आणि एक चार वर्षाची आणि दुसरी आठ वर्षाच्या मुलीसह उपोषण सुरू केले. आज पहिल्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेने दखल न घेऊन निगरगट्ट पणा दाखवला आहे. विशेष म्हणजे याची माहिती विस्तार अधिकारी वानखडे याना सुद्धा असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.

पत्र देऊन प्रकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच....

या प्रकरणात जिल्हा परिषद यांचकडे सुद्धा सुनावणी झाल्याचे संगीताने जात आहे. मागील दीड वर्षपासून यासाठी लढा देत असल्याचे पंकज सांगतात. काहीच मार्ग न निघत असल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसले असल्याचे ते सांगतात.

मागील 11 महिण्याचे मानधन मिळाले नाही......

पंकज हा संगणक परिचालक म्हणून मिळणाऱ्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करतो. अश्या परिस्थिती आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे तो सांगतोय. त्यामुळे त्यांने उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र गलेलठठ पगार घेणाऱ्यांना त्याचा प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

सरपंच यांना अनेक कामात भ्रष्टाचाराला अरथडा होत असल्याने सूड भावनेने त्रास देत असल्याचेही आरोप केले आहे. मात्र यावर त्याचा दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सरपंच अनिता ढोले यांना संपर्क झाला नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांची बजावू कळू शकली नाही.

संगणक परिचालक संघटनेचा उपोषणाला पाठींबा

सरपंच बोरागाव याचा विरोधात उपोषण सुरू केले. संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दिलाने काम बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे याच फटका इतर ग्रामपंच्यातवर पडण्याची शक्यता आहे. यात सुरवातीला काही लोकांनी काम बंद सुरू केले असून प्रश्न मार्गी न लागल्यास इतरही ठिकाणी काम बंद करण्याचा इशारा संघटनेने निवेदनातून केला आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.