ETV Bharat / state

वर्ध्यातील महाकाली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू - महाकाली धरण

महाकाली धरणातील मंदिराचा कळस दिसायला लागला तेव्हापासून आकर्षण निर्माण झाले आहे. अनेक वर्षानंतर मंदिर उघडे पडल्याने लोक छातीच्यावर पाणी असतानाही दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.

वर्ध्यातील महाकाली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Jun 22, 2019, 9:50 AM IST

Updated : Jun 22, 2019, 1:22 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील महाकाली धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या दुष्काळाने धरणातील मंदिर उघडे पडले आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेला असता पोहण्याचा मोह आवरला नसल्याने त्याने उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने त्याचा मृत्यू झाला.

वर्ध्यातील महाकाली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

गोपाल नागोसे (वय २८), असे या मृत तरुणाचे नाव आहे. महाकाली धरणातील मंदिराचा कळस दिसायला लागला तेव्हापासून आकर्षण निर्माण झाले आहे. अनेक वर्षानंतर मंदिर उघडे पडल्याने लोक छातीच्यावर पाणी असतानाही दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. त्याचप्रमाणे गोपाल शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्याने तो पाण्यात बुडाला.

खरांगणा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शोधमोहीम राबवली. मात्र, अंधार झाल्यानंतरही मृतदेह सापडला नव्हता. अखेर हायमास्ट लावून शोधमोहीम राबवली. त्यानंतर रात्री उशिरा गोपालचा मृतदेह सापडला.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी पाण्यात जाऊ नये, असे फलक लावले. मात्र, कोणीतरी हे फलक काढून पाण्यात फेकून दिले. सुचनांकडे दुर्लक्ष करत फलक फेकल्याने गोपालचा जीव गेला. याबाबत ठाणेदार संतोष शेगावकर यांनी दुःख व्यक्त केले. मात्र, आता तरी लोकांनी पाण्यात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Intro:
महाकाळी धरणात पोहायलण्याया गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू
- पाच वाजतापासून 7 तास चालली शोधून मोहीम
- उशिरा रात्री पर्यंत शोध मोहीम राबवत मृतदेह काढला बाहेर

आर्वी तालुक्यातील महाकाळी धरणाचे मंदिर यंदाच्या दुष्काळाने उघडे पडले. यामुळे छातीच्या वर पाणी असतानाही लोक दर्शनासाठी गर्दी करू लागले. यातच हा तरुण मित्रांसोबत गेला. पाहण्याच्या मोह आवरला नसल्याने उडी घेतली. यात मात्र वर्ध्याच्या म्हसाळा परिसरातील गोपाल नागोसे वय 28 या तरुणांचा मृत्यू झाला.

गोपाल शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास महाकाली धरणाच्या पत्रातील उघड पडलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेला. या मंदिराचा कळस दिसायला लागला तेव्हापासून आकर्षण निर्माण झाले होते. अनेक वर्षानंतर मंदिर उघडे पडल्याने लोक गळा भर पाणी असतांना दर्शनासाठी गर्दी करू लागले.
गोपाल दर्शनासाठी गेला होता. मात्र पाण्यात पोहण्यासाठी उतरलाया असता खोल पाण्यात गेला. यावेळी धरणातील पाण्याने घात केला. मित्रांना काही कळेपर्यंत तो बुडालेला होता. आरडा ओरड सुरू झाला. याची माहिती खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर पोलीस ताफ्यासह पोहचले. स्थानिक तैराकच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. अंधार पडूनही मृतदेह हाती लागला नाही. अखेर हायमास्ट लावून शोध मोहीम पोलिसांच्या उपस्थितीत सूरु ठेवली. उशिरा रात्री शव सापडले आणि मोहीम थांबली. पाण्याबाहेर मृतदेह आणताच कुटुंबियानी टाहो फोडला मात्र गोपाल त्यांच्यातून निघून गेला होता.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली पाहता पोलिसांनी पाण्यात जाऊ नये असे फलक लावले. मात्र कोणीतरी हे फलक काढून पाण्यात फेकून दिले. सूचनानकडे दुर्लक्ष करत फलक फेकल्याने गोपालचा मात्र जीव गेला. याबाबत ठाणेदार संतोष शेगावकर यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. पण आता तरी लोकांनी पाण्यात जाऊ नये असे आवाहन सुद्धा केले आहे.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Jun 22, 2019, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.