ETV Bharat / state

वर्धा : लग्नाच्या दोन दिवसआधी बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह.. परिसरात खळबळ

विष्णु हा रोज सकाळी अरविंद योग साधना शक्ती पीठ, अरविंद आश्रम, हातूरणा येथे योग साधनेसाठी जात होता. 6 जानेवारीला तो शेतात जातो, असे सांगून बेपत्ता झाला.

Wardha
वर्धा
author img

By

Published : Jan 15, 2020, 11:45 PM IST

वर्धा - जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील साहुर येथे तरुणाचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह त्याचाच शेतात छिन्न-विच्छिन्न अवस्थेत बुधवारी आढळून आला. मृत तरुणाचा 8 जानेवारीला विवाह होता. तर तो 6 जानेवारीपासून बेपत्ता होता. कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विष्णू लाड असे मृत तरुणाचे नाव आहे.

वर्ध्यात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

विष्णु हा रोज सकाळी अरविंद योग साधना शक्ती पीठ, अरविंद आश्रम, हातूरणा येथे योग साधनेसाठी जात होता. 6 जानेवारीला तो शेतात जातो, असे सांगून बेपत्ता झाला. घरी परत न आल्याने शोध सुरू झाला. शेतात जाऊन पाहणी केली असता, त्याची दुचाकी मिळाली. मात्र, तो सापडला नाही. आश्रमात सुद्धा तो सापडला नाही

त्यानंतर विष्णु बेपत्ता झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांत देण्यात आली. मात्र, मिसिंग तक्रारीत 24 तासानंतरच कारवाई होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर 2 दिवसानंतरही विष्णू घरी परत आला नाही. त्यामुळे घातपाताची तक्रार पोलिसात देण्यात आली. अखेर शोधा-शोध केली असता, विष्णुच्याच शेतामध्ये त्याचा मृतदेह कपाशीच्या झाडाजवळ आढळून आला.

पोलिसांनी डॉक्टरांना घटनास्थळी बोलवून मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. त्यानुसार शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण आणि वेळ स्पष्ट होईल. त्यांनतर गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळेल, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

Intro:mh_war_ashti_hatya_byte_7204321

बाईट- नीरज इंगोले, मृतक विष्णुचे जावाई)

अचानक बेपत्ता झालेल्या तरुणांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

- लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता तरुण
- तक्रार देऊनही पोलीस प्रशासनाची दिरंगाई कुटुंबीयांचा आरोप
-

वर्धा- वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील साहुर येथील तरुणांचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह त्याचाच शेतात छिन्न विच्छिन्न अवस्थेत बुधवारी आढळून आला. मृतक तरुणांचा ८ जानेवारीला विवाह असतांना तो ६ जानेवारीपासून बेपत्ता होता. कुटुंबियांकडून घात पाताच संशय व्यक्त केला जात आहे. विष्णु लाड असे मृतकाचे नाव आहे.

विष्णु हा रोज सकाळी अरविंद योग साधना शक्ती पीठ, अरविंद आश्रम, हातूरणा येथे योग साधनेसाठी जात होता. 6 जानेवारीला तो शेतता जातो असे सांगून बेपत्ता झाला. घरी परत न आल्याने शोध सुरू झाला. शेतात जाऊन पाहणी केली असता त्याची दुचाकी मिळाली. पण तो बेपत्ता झाला होता. आश्रमात सुद्धा विचारपूस करण्यात आली. विष्णुचे लग्न दोन दिवसांनावर असताना अचानक न सांगता जाणे संशयास्पद होते. अखेर तेच झाले. ज्या शेतात शोधून सापडला नाही. लगतच्या विहिरी पालथ्या घातल्या याचा काहीच फायदा झाला नाही. त्याच शेतातील कपाशीच्या झाडाजवळ छिन्न विच्छिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

विष्णु बेपत्ता झाल्यानंतर आष्टी पोलिसात तक्रार देण्यात आली. पण मिसिंगवर 24 तासा नंतर कारवाई होईल असे सांगण्यात आले. दोन दिवस वाट पाहून घरी परत आला नसल्याने घात पाताचा संशयाची तक्रार आष्टी पोलिसात देण्यात आली. यात हातूरणा येथील आश्रमवार सुद्धा संशय घेण्यात आल्याचे जावई नीरज इंगोले यानी संगीतले. शिवाय पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली नाही असा आरोप सुद्धा यानिमित्याने केला जात आहे.

यात मृतदेहाची अवस्था पाहता घातपताचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीसानी घटनास्थळी डॉक्टरांना बोलावून शवविच्छेदन केले. यात शवविच्छेदन अहवालात मिळाल्या नंतर मृत्यूचे कारण आणि वेळ स्पष्ट होईल. त्यांनतर गुन्ह्याचा तपासाला दिशा मिळेल अशी माहिती पोलीस विभागाकडून सांगितली जात आहे. यात प्रकरणाचा छडा लावण्यात आष्टी पोलिसांना यश मिळते का हे पाहावे लागणार आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.