वर्धा: गावामध्ये दारूबंदी करावी तसेच अवैध धंदे बंद करावे. यासाठी महिलांनी व पुरुषांनी मिळून रात्री एक वाजता चक्काजाम आंदोलन केले. यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली. जवळपास चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी अवैध व्यवसायिकारावर जो कारवाईचा भडगा उचललेला आहे. त्यामुळे नागरिक शांततेची झोप घेऊ शकतात. परंतु ही कारवाई काही ठिकाणी होते. पोलिसांकडून अवैध व्यवसायिकांवर कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
वाहतुकीचा पुरता खोळंबली: जोपर्यंत पोलीस अधीक्षक आम्हाला घटनास्थळावर येऊन आश्वासन देणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. असा पवित्र गावकऱ्यांनी घेतला आहे. गावकऱ्यांनी केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला आहे. दारू विक्रेत्या महिलेने गावामध्ये गाव गुंड बोलवून गावात तोडफोड केली. त्यामुळे गावकरी महिला यांनी चक्काजाम आंदोलन केले. तर दारू विक्रेत्याने गावगुंडांना बोलावल्याने वातावरण तापले होते.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस दाखल: गावामध्ये दारू विक्री वाढली आहे. दारू विक्रेत्यांचा त्रास होत असल्याने शेवटी नागरिकांना हे पाऊल उचलावे लागल्याचे पोलीसांना सांगितले. तर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. त्यांनी महिला यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काही यश आले नाही. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी शांततेचा मार्ग व कायद्याचा मार्ग अवलंबून अशी विनंती आंदोलनकर्त्यांना केली. यावेळी दारू विक्रत्यावर मोठी कारवाई करावी.
रात्री एक वाजता आंदोलन सुरू: वर्धा मध्ये पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी नव्याने आपला पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर हसन यांनी पदभार स्वीकारल्यापासून दारू विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया करण्याचे आदेश पोलीस विभागांना देण्यात आले आहेत. त्यावरून पोलीस कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करत आहेत. काहीच ठिकाणी ह्या कारवाई होत असल्याने नागरिक संतप झाले आहे. आता हा संताप मोठा झाल्याने त्याचे स्वरूप रास्ता रोको आंदोलनामध्ये झाले आहे. वर्धा मधून ही मोठी घटना असून रात्री एक वाजता पासून नागरिकांनी हे आंदोलन सुरू केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. पोलिसांचाही मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे.
हेही वाचा: Wardha Crime दुचाकी तपासताना आढळला सुगंधित तंबाखू वर्धा पोलिसांची कारवाई