ETV Bharat / state

हिंगणघाट : महिलेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी; आत्महत्येचे कारण अस्पष्ट - खानगाव

घटनेची माहिती खानगावचे पोलीस पाटील संजय पाटील यांनी अल्लीपूर पोलीस स्टेशनला दिली. अल्लीपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून जमादार त्रंबक मडावी, शिपाई सतीश नैताम यांनी घटनास्थळ पोहचले. मृतक महिलेसह चिमुकल्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रकरण तपासात घेतले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकलेले नाही. पुढील तपास ठाणेदार वाय एस कामाले करत आहे.

हिंगणघाट : महिलेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

author img

By

Published : Apr 26, 2020, 6:09 PM IST

Updated : Apr 26, 2020, 7:17 PM IST

वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील खानगावमध्ये एका महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. निर्मला सुमित कुरवटकर (वय २४वर्ष) महिलेचे नाव, तर राधिका (वय ४वर्ष), काजल (वय ३वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्येची ही घटना बावापूर शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या तिघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या आत्महत्येच्या घटनेबद्दलची अधिकची माहिती अशी की, मुळची यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव(खरडा)ची असलेली ८ ते १० मेढपाळांची कुटुंबे गेल्या दोन महिन्यापासून खानगाव-बावापूरच्या शिवाऱ्यात मेंढ्यापालनासाठी वास्तव्यास आहेत. येथाील शेतकरी महेश ठाकरे यांच्या शेतात त्यांचे वास्तव्य होते. शनिवारी कुरुवटकर कुटुंबीयांची एक बैल जोडी जंगल शिवारात भरकटली होती. त्यानंतर आज सकाळी त्या बैलांचा शोध घेण्यासाठी सर्वच महिला रानात गेल्या होत्या. तर पुरुष मंडळी शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी रानात गेले होते.

हिंगणघाट : महिलेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

अखेर बैलांचा शोध न लागल्याने इतर सर्व महिला राहोटीवर माघारी परतल्या, मात्र निर्मला कुरकटकर या चिमुकल्यांना घेऊन रानातच थांबल्या. दुपार झाली तरी त्या न परतल्याने त्या महिला पुन्हा तिच्या शोधात रानाच्या दिशेने गेले. यावेळी बावापूर शिवारातील ज्ञानेश्वर थुल यांच्या शेतातील विहिरी जवळ तिची चप्पल आढळून आली. विहिरीत डोकावून पाहिले असताना तिघांचे मृतदेह आढळून आले.

Last Updated : Apr 26, 2020, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.