ETV Bharat / state

वर्ध्यात रान डुकराचा तीन शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

रानडुकराने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना वर्ध्यात तिन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून २ जण जखमी आहेत.

मृत शेतकरी
author img

By

Published : May 4, 2019, 11:48 PM IST

वर्धा - जिल्ह्यात रानडुक्कर पिकांसोबतच शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहेत. आज देवळी तालुक्यातील दापोरी येथील एका शेतकऱ्याचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, हिंगणघाट आणि आष्टी तालुक्यात २ घटनांमध्ये शेतकरी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

देवळी तालुक्यातील दापोरी शेत शिवारात वासुदेव ठाकरे (वय ६५ ) हे सकाळी शेतात जात होते. त्यांच्यवर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि सून, असा मोठा परिवार आहे.

रानडुकराने वडनेर जवळच्या फुकटा येथे शेतमजूर शत्रुघ्न धुर्वे यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने गावातील काही कुत्र्यांनी या रानडुकरावर हल्ला केल्याने शत्रुघ्न धुर्वे बचावले. तसेच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन रान डुकराला पिटाळून लावले. धुर्वे हे मोलमजूरी करून संसाराचा गाडा चालवतात.

आष्टी तालुक्यातील पारडी येथील किसनराव सरोद शेतात जाताना अचानक रानडुकराने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त बिघडत असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले.

Intro:
R_MH_4_MAY_WARDHA_RANDUKKAR_HALLA_VIS_1
मृतक शेतकरी वासुदेव ठाकरे यांचा फोटो सोबत जोडत आहे.

वर्ध्यात रान डुकराच्या हल्ल्याच्या तीन घटना, एका शेतक-याचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

वर्ध्यात सध्या जंगली श्वापदाचा त्रास पिकांनसोबत शेतकऱ्यांचा जीवावर उठले असल्याचे दिसून पडत आहे. आज देवळी तालुक्यातील दापोरी येथे एका शेतकऱ्यांचा सेवाग्राम येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर हिंगणघाट आणि आष्टी तालुक्यात दोन घटनांमध्ये शेतकरी जखमी झाले असून उपचार सुरू आहे.

देवळी तालुक्यातील दापोरी शेत शिवारात वासुदेव ठाकरे ( ६५ )हे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यवर रानडुकराने हल्ला केला.त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचाराकरीता त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दुपारी २ वाजतच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि सुन असा मोठा परिवार आहे.

रानावनातून भटकलेल्या रानडुकराने वडनेर जववळच्या फुकटा येथे शेतमजूर शत्रुघ्न धुर्वे वय ५५ यांस पहाटेच्या सुमारास परसाकडे जात असताना रानडुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. सुदैवाने गावातील काही कुत्र्यांनी या रानडुकरावर हल्ला केल्याने
शत्रुघ्न धुर्वे बचावले. तसेच गावातील नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेऊन रान डुकराला पिटाळून लावले. धुर्वे हे मोलमजूरी करणारन संसाराचा गाडा चालावतात.

आष्टी तालुक्यातील पारडी येथील किसनराव सरोद शेतात जातांना अचानक रानडुकराने हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त बिघडत असल्याने पुढील उवचरासाठी नागपूरला उपचारासाठी रवाना करण्यात आले.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.