ETV Bharat / state

तब्बल एका दशकानंतर उघडले बोर धरणाचे दरवाजे; 85 टक्के पाणीसाठा

सेलू तालुक्यातील बोर धरणात तब्बल एका दशकानंतर ऑगस्ट महिन्यात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. या कारणाने तीन दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

wardha Seloo bor dam 85 percent full
तब्बल एका दशकानंतर उघडले बोर धरणाचे दरवाजे
author img

By

Published : Aug 23, 2020, 9:28 PM IST

वर्धा - यंदाच्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे सेलू तालुक्यातील बोर धरणात तब्बल एका दशकानंतर ऑगस्ट महिन्यात 85 टक्के पाणीसाठा झाला आहे. या कारणाने तीन दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

बोर धरण परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात हे धरण 85 टक्के भरले. धरणाच्या बांधकामानुसार आणि पावसाचे पुढील नियोजन पाहता धरणातील पाणी सोडावे लागले आहे. मुख्य कार्यकारी अभियंता एस. सी. राहाणे यांच्या उपस्थित बोर धरणाच्या गेटचे पूजन करून 1, 5 व 9 नंबरचे असे तीन गेट खुले करण्यात आले आहेत. यावेळी उपविभागीय अभियंता यू. बी. भालेराव, सेलूचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पीएसआय सौरभ घरडे, हिंगणी महावितरणचे अभियंता नेवारे, पोलीस पाटील कोकाटे, हिंगणी पोलीस पाटील चचाने उपस्थित होते.

बोर धरणाचे तीन दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले असून २० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. बोर धरणाची पातळी 330.40 मीटर असून सद्या 328.90 मीटर पाणी पातळी झाली आहे. पुढील तीन दिवस यावर लक्ष ठेवून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन केले जाणार आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच 85 टक्के पाणीसाठा धरणात झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा - कोरोना रोखण्यासाठी आणखी एक महिना काळजी घेणे गरजेचे - देवेंद्र फडणवीस

हेही वाचा - सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.