वर्धा - सध्या जगभरात कोरोना आजाराने भयभीत करून सोडले आहे. याच आजाराचा शिरकाव आता महराष्ट्रात झाला आहे. यामुळे संसर्गजन्य आजार असल्याने काळजी घेणे महत्वाचे आहे. पण हा आजाराची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. वर्ध्याच्या डॉक्टरांच्या असलेल्या वैदकीय जनजागृती मंचाच्या वतीने सामाजिक बांधिलकी ठेवत एका गाण्याच्या माध्यमातून जनजागृती उप्रकमाला सुरवात केली आहे.
भारतात कोरोनाच्या रुग्णासंख्येत वाढ होत चाललेली आहे. यामुळे संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी वर्ध्यातील डॉक्टरांना कोरोना प्रतिबंध जिंगल साँग तयार केले आहे. वैदकीय जनजागृती मंचाचे डॉ. प्रशांत वाडीभस्मे यानी हे गाणे तयार केले आहे.
हेही वाचा -वर्ध्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, आर्थिक मदत मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी
कोरोना बद्दल आजाराची जनजागृती करण्यासाठी गाणे हे प्रभावी माध्यम ठरू शकेल. याच उद्देशाने चार कडव्याचे गाणे हिंदीमध्ये साध्या सोपी पद्धतीने लिहून ध्वनिफीत आणि चित्रफित तयार करण्यात आली आहे. सालइ कला येथील पीएससी केंद्रात कार्यरत आणि जनजागृती मंचाने सचिव डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी हे कोरोना प्रतिबंध जिंगल साँग तयार केले. त्यांनी स्वतः हे गाणे गायले असून प्रवीण चवरे यांनी त्याला संगीत दिले आहे.
वैद्यकीय जनजागृती मंचाने हे गाण प्रोड्यूस केले असून 'बात पते की एक बताऊ...’ या ओळीने गाण्याची सुरवात केली आहे. वैदकीय जनजागृती मंचाच्या वतीने यापूर्वी सुद्धा जनजागृती मोहीम राबवली आहे. मागील काळात स्वाइन फ्लू असो किंवा मग डेंग्यू यांसारख्या आजाराचे थैमान असो, विषयांना धरून लोकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांना त्यांना याबद्दल योग्य माहिती पोहचवण्याचे कार्य जनजागृती मंच करत आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या भीतीने परदेशातून आलेल्या दोन जणांवर पाळत
सध्या शहरात होर्डिंग आणि या गाण्याच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ध्वनिफीतचे अनवारान जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, यांच्यासह वैदकीय जनजागृती मंचाचे डॉ सचिन पावडे, डॉ हिवं, श्याम भेंडे यांच्यासह अनेक पदाधिकरी उपस्थित होते.