ETV Bharat / state

Wife Burned Husband : बायकोने नवऱ्याची हत्या करुन शरीराचे तुकडे जाळले - wife killed her husband

Wife Burned Husband : वर्ध्याच्या पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस मिळालेल्या मुंडक्याचा आधाराव हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. यात पतीची हत्या पत्नीनेच अल्पवयीन मुलांच्या मदतीने केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. घरात होणारे वाद आणि मारहाणीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

वर्धा गुन्हे
वर्धा गुन्हे
author img

By

Published : Aug 10, 2022, 9:31 AM IST

Updated : Aug 10, 2022, 9:47 AM IST

वर्धा - वर्ध्याच्या पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस मिळालेल्या मुंडक्याचा आधाराव हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. यात पतीची हत्या पत्नीनेच अल्पवयीन मुलांच्या मदतीने केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यात घरात होणारे वाद आणि मारहाणीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मृतकाच्या पत्नीसह 14 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

पत्नीला अटक करत आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात - पुलगाव शहराच्या रेल्वे पटरीजवळ 6 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचे अर्धवट जळालेले शीर मिळून आले होते. त्यानंतर रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी 7 ऑगस्टला मार्ग दाखल केला. या याप्रकरणात पोलीस तपासात ते बेवारस शरीर शीर पुलगाव येथील एका अज्ञात व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मृतकाचा भावानी दिलेल्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यात पत्नीला अटक करत आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

मृतक दररोज पत्नीसोबत दारूच्या नशेत करत होता भांडण - मृतक हा मलकापूर बोदड येथील रहिवासी होता. काही महिन्यांपासून तो पुलगावात राहत होता. तेच वृद्ध वडील हे अजूनही मलकापूर येथे वास्तव्यास आहे. मृतक पहिले गृहरक्षक दलात काम करत होता. पण आंदोलनात सहभाग घेतल्याने निलंबित झाला होता. त्यानंतर रोज मजुरी करत दारूचे व्यसनाधीन झाला. त्यामुळे दररोज पत्नीशी वाद घालत होता. तेच मोठा मुलगा दहावीत शिकत असून दुसरा मुलगा सहा वर्षाचा आहे. अखेर दररोजच्या त्रासाचा अंत कारण्याचे ठरवत रागाचा भरात गळा आवळून हत्या केली.

अर्धवट जळाले शीरच पोलीस तपासात महत्वाचा धागा ठरले - हत्येनंतर मृतदेहाची व्हिलेवाट करण्यासाठी शरीराचे तुकडे करत जाळण्याचा बेत आखला. त्यानंतर शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मलकापूरला ऑटो केलं. एका मोठ्या बॅगेत मृतदेहाचे तुकडे भरून मूळगावी मलकापूर बोदड नेले. यावेळी सासऱ्याचे काय आणले भरून अशी विचारणा केली. तेव्हा त्यात जुने कपडे असल्याचे सांगितले. त्यानंतर चक्क वडिलांसमोर आणि तिच्या मुलाने पोत्यातून मृतदेह जाळला. मात्र, शीर जळाले नसल्याने पंचायत झाली. अखेर अर्धवट जळलेलं शरीर पुलगाव रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ट्रॅकवर फेकून देत अपघाताचा बनाव केला. पण बिंग फुटले आणि मृतकाचे शरीराने मारेकरी पत्नीने हत्या केल्याचा मार्ग पोलिसांसाठी सुकर करून दिला.

पोलिसांनी माहितीच्या आधारे मलकापूर गाठत फॉरेन्सिक अल्पवयीन मुलांच्या मदतीने जळालेल्या अवस्थेत हाड जमा केली. त्याची उत्तरीय तपासणी फॉरेन्सिक केली जाणार आहे. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे नेमके कसे केले ? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Devendra Fadnavis on Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, सरकारही मजबूत आहे- फडणवीस

हेही वाचा - Radhanagari Dam : राधानगरी धरण 100 टक्के भरलं, पहाटे पहिला स्वयंचलित दरवाजे उघडला

Last Updated : Aug 10, 2022, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.