वर्धा - न्यायाधीशाच्या त्रासाला कंटाळून वरिष्ठ लिपिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उमेश खोकले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत लिपिकाचा भावाने न्यायाधिशाच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून वर्धा शहर पोलीस ठाण्यात कुटुंबीयांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.
उमेश खोकले हे न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. सकाळी न्यायालयाच्या तळमजल्यातील शौचालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उमेश खोकले यांच्या आत्महत्येनंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी दिवसभर कामबंद आंदोलन केले. यावेळी न्यायाधीशांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.