ETV Bharat / state

चार मतदारसंघ, 14 टेबल... वर्ध्यातील उमेदवारांचे भवितव्य होणार स्पष्ट - Maharashtra Assembly Elections 2019

जिल्हा प्रशासन मतमोजणीला सज्ज झाले असून, प्रचंड पोलीस बंदोबस्तात होणा-या मतमोजणीतून चार मतदारसंघातील 47 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल असणार आहेत. वर्धा विधानसभेची मतमोजणी एफसीआय गोडाऊन वर्धा, देवळी विधानसभेची मतमोजणी तहसील कार्यायात, हिंगणघाटची उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर आर्वी विधानसभेची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात होणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण व्यवस्था केली आहे.

Maharashtra Assembly Elections 2019
author img

By

Published : Oct 24, 2019, 1:50 AM IST

Updated : Oct 24, 2019, 3:13 AM IST

वर्धा - जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदारसंघाच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून, वर्ध्यातील सर्व मतमोजणी केंद्रांमध्ये 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे.

चार मतदारसंघ, 14 टेबल... वर्ध्यातील उमेदवारांचे भवितव्य होणार स्पष्ट

जिल्हा प्रशासन मतमोजणीला सज्ज झाले असून, प्रचंड पोलीस बंदोबस्तात होणा-या मतमोजणीतून चार मतदारसंघातील 47 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल असणार आहेत. वर्धा विधानसभेची मतमोजणी एफसीआय गोडाऊन वर्धा, देवळी विधानसभेची मतमोजणी तहसील कार्यायात, हिंगणघाटची उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर आर्वी विधानसभेची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात होणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण व्यवस्था केली आहे.

विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी 8 वाजता सुरवात होणार असून मतदान केंद्राच्या संख्येनुसार फेऱ्या होणार आहेत. यात वर्धा (25 फेऱ्या), देवळी (24 फेऱ्या), हिंगणघाट (25 फेऱ्या) व आर्वी (22 फेऱ्या) होतील. प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणीसाठी प्रती टेबल दोन मतमोजणी अधिकारी व एक सूक्ष्म निरिक्षक असे तीन अधिकारी याप्रमाणे 14 टेबलवर एकुण 42 अधिकारी एका मतदारसंघासाठी तर चार मतदारसंघांसाठी एकूण 168 अधिकारी मतमोजणीचे काम पाहणार आहेत.

मतदार संघनिहाय झालेले मतदान..
आर्वी विधानसभा मतदारसंघ (67.25 टक्के), देवळी विधानसभा मतदारसंघ (63.49 टक्के), हिंगणघाट मतदारसंघ (64.51 टक्के) आणि वर्धा (53.14 टक्के) मतदान झालेले आहे. चारही विधानसभा मतदार संघात एकुण 11 लाख 49 हजार 958 मतदारांपैकी 7 लाख 10 हजार 219 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हा हक्क बजावताना कुठल्या उमेदवारला कौल मतदारांनी दिला हे स्पष्ट होण्यासाठी काही तासांची प्रतीक्षा आता राहिलेली आहे.

हेही वाचा : वर्ध्यात भाजप-काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत, कोणाचं पारड राहणार जड?

Intro:बाईट - सुरेश बगळे, निवडणूक निर्णय अधिकारी,वर्धा.
चार विधानसभेच्या 14 टेबलवर होणार आमदारांच्या भवितव्याची होणार चाचपणी

- प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबल

- पोलीसांचा चोख बंदोबस्त

- ते चार उमेदवार कोण, मतदारांचा कौल कोणाला

वर्धा - जिल्हयातील आर्वी, देवळी, हिंगणघाट, आणि वर्धा विधानसभा मतदार संघाच्या निकलाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुरवात होणार असून यात चारही मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर 14 टेबलवर ही मोजणी होणार आहे. प्रत्यके फेरीनंतर याच 14 टेबलवर आमदारकीचे पुढील पाच वर्षांचे भविष्याची चाचपणी याच टेबलवर होणार असल्याने आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जिल्हा प्रशासन मतमोजणीला सज्ज झाले असून प्रचंड पोलीस बंदोबस्तात होणा-या मतमोजणीतून चार विधानसभेच्या 47 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल असणार आहे. वर्धा विधानसभेची मतमोजणी एफसीआय गोडावून वर्धा, देवळी विधानसभेची मतमोजणी तहसिल कार्यायात, हिंगणघाटची उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर आर्वी विधानसभेची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात होणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण व्यवस्था केली आहे.

विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी 8 वाजता सुरवात होणार असून मतदान केंद्राच्या संख्येनुसार फे-या होणार आहेत. यात वर्धा-25 फे-या, देवळी- 24 फे-या, हिंगणघाट- 25 फे-या व आर्वी - 22 फे-या होतील. प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल व त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणी साठी प्रती टेबल दोन मतमोजणी अधिकारी व एक सुक्ष्म निरिक्षक असे तीन अधिकारी याप्रमाणे 14 टेबलला एकुण 42 अधिकारी एका विधानसभेसाठी तर चार विधानसभेसाठी एकुण 168 अधिकारी मतमोजणीचे काम पाहणार आहेत.

मतदार संघनिहाय झालेले मतदान –
आर्वी विधानसभा मतदारसंघ 67.25 टक्के, देवळी विधानसभा मतदार संघ 63.49 टक्के, हिंगणघाट मतदारसंघ 64.51 टक्के आणि
वर्धा 53.14 टक्के मतदान झालेले आहे. चारही विधानसभा मतदार संघात एकुण 11 लाख 49 हजार 958 मतदारांपैकी 7 लाख 10 हजार 219 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. हा हक्क बजावताना कुठल्या उमेदवारला कौल मतदारांनी दिला हे स्पष्ट होण्यासाठी काही तासची प्रतीक्षा आता राहिलेली आहे.

"कही खुशी कही गम, दिवाली मे फटाके नही फोडेगे हम"

यंदा निवडणूक दिवाळीच्या सणाच्या दोन दिवसापूर्वी आल्याने विजयी उमेदवाराची फटाके आतिषबाजीला उद्यापासून सुरू होणार आहे. असे असले तरी पराभूत उमेदवारांच्या घरात दिवाळीत फटाके फुटतील याची शक्यता नसणार यामुळे कही खुशी कही गम हे चित्र पहावयास मिळणार आहे. शेवटी राजकारण जय पराजयाचा खेळ असला तरी पाच वर्षे वाट पाहणारे खेळाडूंच्या दिवळीवर निकालाने विर्जन पडण्याची शक्यता अधिक आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 3:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.