ETV Bharat / state

धारदार शस्त्राने तरुणाचा खून, मारेकऱ्यांचा शोध सुरू - मृतदेह

सिंधी (रेल्वे) भोसा मार्गावर रस्त्याच्याकडेला कॅनलजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

इकबाल उर्फ बाबा तजवर अली
author img

By

Published : Feb 15, 2019, 9:47 AM IST

वर्धा - सिंधी (रेल्वे) भोसा मार्गावर रस्त्याच्याकडेला कॅनलजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून अज्ञाताने त्या व्यक्तीची हत्या झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. इकबाल उर्फ बाबा तजवर अली (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो सिंदी रेल्वे येथील रहिवासी आहे.

याबाबत सिंदी रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच बघ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळापासून जवळच रस्त्याच्याकडेला मृत व्यक्तीची दुचाकी आढळून आली आहे. प्राथमिक पाहणीवरून इकबालच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे.

याप्रकरणी सिंधी रेल्वे पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. या हत्येचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पो. उप. निरीक्षक रामकृष्ण वाकडे यांनी ईनाडू इंडियाला दिली.

Intro:R_MH_14_FEB_WARDHA_HATYA_VIS_1
FTP ने पाठवत आहे.

वर्ध्यातील इसमाची धारदार शस्त्राने हत्या, आरोपी अज्ञात

वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे भोसा मार्गावर रस्त्याच्या कडेला कॅनलजवळ इसमाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती सिंदी रेल्वे पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यात इसमाची धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या केल्याचे निदर्शनास आले. इकबाल उर्फ बाबा तजवर अली वय 40 असून तो सिंदी रेल्वेचा रहिवासी आहे.

इकबालचा मृतदेह सिंधी रेल्वे आज सकाळी आढळून येताच चांगलीच खळबळ निर्माण झाली. पाहता पाहता बघ्यांची गर्दी घटना स्थळावर पोहचली. विशेष म्हणजे मृतकाचे दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आढळून आली. प्राथमिक पाहणीवरून इकबालच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे. याप्रकरणी सिंधी रेल्वे पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील एकाला संशयिताला ताब्यात घेतले आल्याची माहिती पुढे येत आहे. हत्येमागचे कारण शोधत मरेकऱ्याचा शोध घेतले असल्याची माहिती पीएसआय रामकृष्ण वाकडे यांनी ईनाडू इंडियाला दिली आहे.

Body:पराग ढोबळे वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.