वर्धा- वर्ध्याच्या वायफड येथील पारधी बेड्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यासाठी नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानचे विद्यार्थी शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) वर्ध्यात आले. या विद्यार्थ्यांनी पारधी बेड्यावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता पंधरवडा साजरा करत असताना उमेद शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेत स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेचा संदेश दिला.
शासनाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्यामध्ये नागपूर येथील व्हीएनआयटी अंतर्गतदेखील स्वच्छता पंधरवडा राबविला आहे. याच पंधरवड्याअंतर्गत येथील विद्यार्थ्यांनी वायफड येथील पारधी बेड्यावर स्वच्छता अभियान राबविले. बेड्यावरील केर-कचरा साफ केला. शिवाय येथील नागरिकांना स्वच्छतेबाबत माहिती देऊन त्याचे फायदेही समजावून संगितले.
हेही वाचा - आम्हाला शिकवू द्या हो....! शिक्षकांचे धरणे आंदोलन
यावेळी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून पिशव्यांमध्ये कचरा भरून परिसर स्वच्छ केला. यामध्ये वर्ध्याच्या रोठा येथील उमेद वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता.
हेही वाचा - जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या यात्रेचा मार्ग अशांततेने बदलला....!