ETV Bharat / state

...जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्याच गाडीची होते तपासणी

author img

By

Published : Mar 29, 2019, 11:07 PM IST

वर्धा जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथकाकडून निवडणूक आचारसंहितेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहणाची तपासणी करण्यात आली. कुठलाही आक्षेप न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेत कामाचे कौतुक केले

जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहणाची तपासणी करतांना स्थिर सर्वेक्षण पथक

वर्धा - जिल्ह्यात सध्या आचारसंहिता सुरू आहे. यामुळे वाहनांची तपासणी करण्याचे काम स्थिर सर्वेक्षण पथकाकडून सुरू आहे. या पथकाकडून आज चक्क जिहाधिकाऱ्यांची गाडी अडवण्यात आली. ही घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील बसलापूर चेकपोस्टवर घडली.

निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. अनेकदा 'माझी गाडी तपासणार का?' असे म्हणत अनेक अधिकारी तपास पथकांशी हुज्जत घालतानाही दिसतात. मात्र, चांदूर रेल्वे तालुक्यातील बसलापूर चेकपोस्टवर याच्या विरुध्द प्रसंग पाहायला मिळाला. वर्ध्याचे जिल्हाधिकारी हे शासकीय वाहनाने धामणगाव-मोर्शी विधानसभा क्षेत्रात स्ट्राँग रुमची पाहणी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान चांदूर रेल्वे तालुक्यात नेमण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून गाडी बसलापूर चेकपोस्टवर थांबवली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी गाडीतून उतरत गाडीची तपासणी करू दिली. खुद्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या (जिल्हाधिकारी) गाडीची तपासणी केल्याने कर्मचारी दचकले. पण कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौतुकाची थाप मिळल्याने कर्मचारी आनंदित झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता वाहनाची एका सामान्य नागरिकांप्रमाणे तपासणी करू दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेत कामाचे कौतुक केले. वर्धा लोकसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथकाकडून चालू असलेले काम कौतुकास्पद आहे. गाडीची तपासणी करून झाल्यानंतर मी त्यांना परिचयही करुन दिला. यावेळी मोर्शी-धामणगाव या विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉग रूमच्या पाहणीकरता गेलो होतो. दरम्यान या प्रसंगानंतर प्रशासकीय यंत्रणेकडून चांगले काम सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

Intro:R_MH_23_MARCH_WARDHA_VAAHAN_TAPASNI_

1 व्हीजवल आणि फोटो FTP केला आहे.

जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची गाडीची पथकाकडून होते तपासणी

जिल्ह्यात सध्या आचारसंहिता सुरू आहे, अशातच वाहनांची तपासणी करण्याचे काम स्थिर सर्वेक्षण पथकाकडून सुरू आहे. मात्र या स्थिर पथकाने जेव्हा चक्क जिहाधिकाऱ्यांची गाडी अडवली. ही घटना चांदूररेल्वे तालुक्यातील बसलापूर चेकपोस्टवर घडली. जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनांची तपासणी सामान्य नागरिक म्हणून करू दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेत कामाचे कौतुक केले.

निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात ठीक ठीक वाहनांची तपासणी केली जाते. अनेकदा तोरा मिरवत माझी गाडी तपासणार का असे म्हणत हुज्जत घालतांनाही मिळतात. यावेळी मात्र जिल्हाधिकारी हे शासकीय वाहनाने धामणगाव मोर्शी विधानसभा क्षेत्रात स्ट्रॉंग रुममची पाहणी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान चांदूररेल्वे तालुक्यात नेमण्यात आल्याने स्थिर सर्वेक्षण पथकाने गाडी बसलापूर चेकपोस्टवर थांबली. जिल्हाधिकाऱ्यांनी गाडीतून उतरत गाडीची तपासणी करू दिली. खुद्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाचा गाडीची तपासणी केल्याने कर्मचारी दचकले. पण कर्मचाऱ्यांचे कौतुकाची थाप मिळल्याने आनंदित झाले.

लोकसभा मतदार संघात स्थिर सर्वेक्षन पथकाकडून चालू असलेलं काम कौतुकास्पद आहे. गाडीची तपासणी करून त्यांना परिचय दिला. यावेळी मोर्शी धामणगाव या विधानसभा मतदार संघातील स्ट्रॉंग रूमची पाहणीला गेलो होतो. यावेळची प्रशासकीय यंत्रणेकडून चांगलं काम सुरू असल्याचे ईटीव्ही भारतला सांगितले.

Body:पराग ढोबळे,वर्धा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.