ETV Bharat / state

निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त; आता तरी बस कर, अशी म्हणण्याची आली वेळ - Mohammad harun agriculture damage aarvi

आर्वी आणि कारंजा तालुक्यात गारपीट झाली असली तरी अवकाळी पाऊस सर्वत्र बरसला आहे. यात आर्वी तालुक्यातील शिरपूर येथील युवा शेतकरी धीरज पखाले यांची १० एकर शेती आहे. यातील दोन एकरात त्यांनी केळीची लागवड केली होती. पण, गारपिटीने केळीची बाग मोडली.

wardha
निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी उध्वस्त
author img

By

Published : Jan 4, 2020, 8:48 PM IST

वर्धा - निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती जुगार होऊन बसली आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना तोंड देणारा जुगार ज्यात नेहमी शेतकरी पराभूत होतो. एकदा निसर्गाची सटकली की बाजारात लाखमोलाचे विकले जाणारे पीक मातीमोल होऊन बसते. या पिकाला न योग्य भाव मिळतं न बाजारपेठ. जिल्ह्यातील शेतकरी सध्या अवकाळी पाऊस आणि गरपिटीमुळे अशाच संकटाला तोंड देत आहे.

निसर्गाचा लहरीपणामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त

आर्वी आणि कारंजा तालुक्यात गारपीट झाली असली तरी अवकाळी पाऊस सर्वत्र बरसला आहे. यात आर्वी तालुक्यातील शिरपूर येथील युवा शेतकरी धीरज पखाले यांची १० एकर शेती आहे. यातील दोन एकरात त्यांनी केळीची लागवड केली होती. पण, गारपिटीने केळीची बाग मोडली. केळीचे घड जमिनीवर पडले. ६० ते ७० हजाराचे नुकसान झाले. कोणतेही सरकार आल्याने काही फरक पडत नाही. कसेतरी जगतो आहे, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख मांडले.

मोहम्मद हारून मोहम्मद सुभान यांची ८ एकर स्वतःची शेती आहे. त्यांनी जवळपास ४७ एकर शेती मकत्याने करत जुगार खेळला. रोज दिवस-रात्र मेहनतीने पीक उभे केले. पण, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे आता शेताकडे जाण्याची इच्छाही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाने साथ दिली असती तर १० लाखापेक्षा अधिक उत्पन्न झाले असते. पण, गारपिटीने १४ एकरातील कपाशी मातीमोल झाली. त्याचबरोबर, २० एकरातील १५ एकर चना खराब झाला. यंदा शेतीच्या जुगारात हरलो. यात ६ ते ७ लाखाचे नुकसान झाले. पण, अजून शेतापर्यंत नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणीच आले नसल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी आशा मोहम्मद हारून यांनी व्यक्त केली आहे.

हीच परिस्थिती जिल्ह्यातील गहू, चना, संत्रा, भाजीपाला पिकांची झाली. चिरंजीव भुतडा यांची ९ एकरात तूर पेरली. मागील वर्षी एकरी ९ पोते तूर झाली होती. यंदा मात्र ३ पोते होते की नाही ही शंका आहे. तुरीवर असलेले नैसर्गिक कवच गारपीट आणि पावसाने निघून गेले. यामुळे आता तूर सोकायला लागते. तुरीचा दाणा हा आता लहान असल्याने वाढ न होता तसाच वाढून जाईल. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी संदीप पोटे, नवनीत होले, सतीश डोंगरे यांचेही तूर, कपाशी, भेंडी आणि कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला असून लाखो रुपयांचे पीक मातीमोल झाले. पण, आता तुटपुंजी मदत देऊन थट्टा न करता भरगोस मदत देऊन पुन्हा गाढा उभा करायला मायबाप सरकारने हातभार लावावा, अशी आशा शेतकरी लावून बसले आहेत.

हेही वाचा- एटीएम मशीन चोरट्यांची टोळी सक्रिय, वर्ध्यात पुन्हा आढळले एक मशीन

Intro:mh_war_nuksan_graound_report_pkg_7204321

बाईट- धीरज पखाले, शेतकरी, शिरपूर आर्वी.
बाईट- मो. हारून मो. सुभान, शेतकरी, शिरपूर आर्वी.
बाईट- चिरंजीव भुतडा, शेतकरी जळगाव, आर्वी.

निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी उध्वस्त झाला, आता तरी बस कर अशी म्हणण्याची वेळ अन्नदात्यावर आली...!

वर्धा / आर्वी
निसर्गाच्या लहरिपणाने शेती जुगार होऊन बसला आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना तोंड देणारा जुगार ज्यात नेहमी शेतकरी पराभूत होतो. एकदा निसर्गाची सटकली की बाजारात लाखमोलाच विकले जाणारे मातीमोल होऊन बसते. मग याच खराब झालेल्या ना भाव मिळत ना योग्य बाजारपेठ. वर्ध्यातील शेतकरी सध्या अवकाळी पाऊस आणि गरपीटामुळे अशाच संकटाला तोंड देत आहे.

आर्वी आणि कारंजा तालुक्यात गारपीट झाले असले तरी अवकाळी पाऊस सर्वत्र बरसला आहे. यात आर्वी तालुक्यातील शिरपूर येथील युवा शेतकरी धीरज पखाले यांची 10 एकर शेती आहे. यातील दोन एकरात केळी त्यांनी केळीची लागवड केली होती. पण गरपीटाने केळीची बाग मोडली. केळीचे घड जमिनीवर पडले. 60 ते 70 हजाराचे नुकसान झाले. कोणतेही सरकार आले तर काही फरक पडत नाही. कसतरी जगतोय आशा शब्दात दुःख मांडले.

मो. हारून मो. सुभान यांची आठ एकर स्वतःच शेती आहे. त्यांनी जवळपास 47 एकर शेती मकत्याने करत जुगार खेळला. रोज दिवसरात्र मेहनतीने पीक उभे केले. पण आता शेताकडे जाण्याची इच्छाही होत नसल्याचे सांगतात. कारण ठरल ते म्हणजे अवकाळी पाऊस आणि गारपीट. निसर्गाने साथ दिली असती तर 10 लाखा पेक्षा अधिक उत्पन्न झाले असते. पण गारपीटाने 14 एकरातील कपाशी मातीमोल झाली. याच बरोबर 20 एकरातील चना 15 एकरातील खराब झाली. यंदा शेतीच्या जुगारात हरलो यात 6 ते 7 लाखाचे नुकसान झाले. पण अजून शेतापर्यंत नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणीच आले नसल्याचे सांगितले जाते. लवकरात पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी आशा व्यक्त करत आहे.

हीच परिस्थिती जिल्ह्यातील गहू चना, संत्रा, भाजीपाला पिकांची झाली. चिरंजीव भुतडा यांची 9 एकरात तूर आहे. मागील वर्षी एकरी 9 पोते तूर झालीय. यंदा मात्र 3 पोतें होते की नाही ही शंका आहे. तुरीवर असलेलं नैसर्गीक कवच गारपीट आणि पावसाने निघून गेले. यामुळे आता तूर सोकायला लागते. तुरीच्या दाणा हा आता लहान असल्याने वाढ न होता तसाच वाढून जाईल. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आल्याचे सांगता. परिसरातील शेतकरी संदीप पोटे, नवनीत होले, सतीश डोंगरे यांचेही, तूर, कपाशी, भेंडी आणि कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

निसर्गाचा लहरिपणाने शेतकरी उद्धवस्त झाला. तोंडाचा घास हिरावला. लाखो रुपयांचे पीक मातीमोल झाले. पण आता तुटपुंजी मदत देऊन थट्टा न करता भरगोस मदत देऊन पुन्हा गाढा उभा करायला मायबाप सरकारने हातभार लावावा अशी आशा शेतकरी लावून बसले आहेत.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.