ETV Bharat / state

नागपूर-हैदराबाद महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहतुकीचा खोळंबा - सिमेंट

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

अपघातग्रस्त ट्रक
author img

By

Published : Jun 22, 2019, 1:16 PM IST

वर्धा - नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जाम चौरस्त्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र वळणावर रस्त्याच्या मधोमध ट्रक उभा राहिल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर रस्ता मोकळा केला.

अपघातग्रस्त ट्रक

चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन हा ट्रक नागपूरला जात होता. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. या घटनेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर बंद झाली. घटना घडताच महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्यात. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी क्रेनने बंद पडलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला केले. या घटनेत दीड ते दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नसून सिमेंटच्या ट्रकचा चालक घटनेनंतर भीतीपोटी फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात पोलिसांनी अपघाताची नोंद करत तपास सूरु केला आहे.

Intro:mh_war_truck_accident_vis1_7204321

महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहतुकीचा खोळंबा

- वाहतूक विस्कळीत, वाहनाच्या रांगा

- जाम चौरासत्यावरील घटना

वर्धा - जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवरील जाम चौरसत्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र वळणावर रस्त्याच्या मधोमध ट्रक उभा राहिल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर रस्ता मोकळा केला.

चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन ट्रक नागपूरला जात होता. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या घटनेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर बंद झाली. घटना घडताच महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्यात.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला.

पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बंद पडलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला केले. या घटनेत दीड ते दोन तास वाहतूक विस्कळीत राहिली.सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नसून सिमेंट भरून असलेल्या ट्रकचा चालक घटनेनंतर भीतीपोटी फरार झाल्याची माहिती सांगितली जाते आहे. यात पोलिसांनी अपघाताची नोंद करत तपास सूरु केला आहे.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.