वर्धा - जिल्ह्यात २ दिवस झालेल्या वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांनाही बसला आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडले होते. त्यामुळे विजपुरवठा खंडीत केला होता. मात्र, आता विद्युत खांब दुरुस्तीचे काम सुरु झाले असून, वीजपुरवठा सुरळीत चालू केला आहे.
वायफड, आमला, तिगाव, लोणसावळी, डोर्ली, धामणगाव (वाठोडा) या गावातील 250 पेक्षा जास्त खांब कोसळले होते. वितरण त्यापैकी १२० विद्युत खांब महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उभे केले आहेत. त्यामुळे खंडीत झालेल्या वीज पुरावठ्यापासून सुटका मिळाली. शिवाय शेतातील तुटलेल्या वायर तसेच खांब उभे झाल्याने शेतीच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे गावकफऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. अजून बरेच काम बाकी असल्याने ते काम लवकर व्हावे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे सांगितले आहे.