ETV Bharat / state

आता गप्प बसणार नाही..!, मंगलकार्यालय व्यावसायिकांचा आक्रमक पवित्रा - corona effect news

विविध मागण्यांसाठी वर्धा येथे मंगलकार्यालय व्यवसायिकांनी सरकार विरोधात मूक मोर्चा काढत धरणे आंदोलन केले.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Nov 2, 2020, 6:30 PM IST

Updated : Nov 2, 2020, 7:13 PM IST

वर्धा - टाळेबंदीनंतर अनेक व्यवसायांचा शुभारंभ झाला आहे. सरकारने लग्नसमारंभास केवळ 50 लोकांची परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मंगलकार्यालाय व्यवसायिकांना मारक ठरत आहे. एकतर मुक्तपणे परवानगी द्या, नाही तर आम्ही व्यवसाय सुरू करू, असा इशारा मंगलकार्यलय व्यावसायिकांनी आंदोलनातून दिला. शहराच्या शिवाजी चौकातून मूकमोर्चा काढत आंबेडकर चौकात धरणे देण्यात आले आहे. यावेळी भाजपचे आमदार पंकज भोयर हे देखील उपस्थित होते.

आपल्या व्यथा मांडताना आंदोलक
  • आता गप्प बसणार नाही

मागील सहा महिन्यांपासून शांत असणारे मंगल कार्यालय, बिछायत व्यावसायिक आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. केवळ पन्नास लोकांनाच परवानगी असल्यामुळे नागरिक मंगलकार्यालयाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुढील आठ दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमचे मंगलकार्यालय आणि संबंधित व्यवसाय स्वतःच सुरू करू, असे म्हणत आता गप्प बसणार नसल्याची भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे.

  • उपाशी मरण्यापेक्षा व्यवसाय करुन मरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगलकार्यालय बंद केली होती. त्यानंतर 50 लोकांच्या उपस्थित मंगलकार्यालय सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, केवळ 50 लोकांसाठी नागरिक मंगलकार्यालयात येत नसून घरातच किंवा परिसरातच छोटेखानी कार्यक्रम उरकत आहेत. यामुळे व्यवसाय बंदावस्थेत असून कामारागांचे पगार देण्यासाठीही पैसे नसल्याने व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आता उपाशी मरण्यापेक्षा व्यवसाय सुरू करुन मरू, असे मत संघटनेचे संजय ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.

  • सरकारने अडचणी समजून घेत प्रश्न निकाली काढावे

मिशन बिगिन अगेनअंतर्गत सरकारने अनेक व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, मंगलकार्यालय, लॉन, बलून सजावट, साउंड, डीजे, फोटो ग्राफर्स, केटरर्स व्यवसाय, घोडेवाले, मंडप डेकोरेशन, लायटिंग व्यवसायिक, अन्य छोटे छोटे व्यवसाय यांच्यासारखे लाखो कुटुंब हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे सरकारने अडचणी समजून घेत लवकरात लवकर हे प्रश्न निकाली काढावे, असे मत भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी व्यक्त केले.

  • व्यवसायाची गंभीरता समजली नसेल ते वेळ द्या

मुख्यमंत्र्यांना व्यवसायाची गंभीरता समजली नसेल तर आमच्याशी चर्चा करा, आम्हाला बाजू मांडू द्या. सगळे सुरू आमचेच व्यवसाय का बंद आहेत, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी आमच्या अडचणी समजून घेण्यासाठी आम्हाला वेळ द्यावी, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.

हेही वाचा - 'केंद्राचे धोरण शेतकऱ्याला उद्धवस्त करणारे'

Last Updated : Nov 2, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.