ETV Bharat / state

जनतेच्या तक्रारींवर आठवडाभरात कारवाई करा; चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रशासनाला आदेश - Order to administer by Chandrasekhar Bawankule

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात नागरिकांनी दिलेली सर्व निवेदने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी सोपवण्यात आले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Aug 25, 2019, 1:47 AM IST

वर्धा- जिल्ह्यातील बेघरांना घरकुलासाठी पट्टेवाटप, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन, रोजगार यासह विविध समस्यांचे शेकडो अर्ज शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जनतेने प्रत्यक्ष भेटून सादर केले. नियमानूसार असलेल्या प्रत्येक अर्जावर आठवडाभरात कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सुमारे तीन तासापर्यंत पालकमंत्र्यांनी नागरिकांची समस्यांची निवेदने स्वीकारली. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांची टीम उपस्थित होती. या कार्यक्रमात नागरिकांनी दिलेली सर्व निवेदने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी सोपवण्यात आली. ज्या समस्या स्थानिक पातळीवर सुटणार नाहीत यावर धोरणात्मक विषयांचे अर्ज मुंबई येथे पाठवण्यात येतील. त्या समस्यांवर मुंबईत बैठक घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमण धारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्या तात्काळ निकाली काढावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मोहता मिलमधील अनेक कामगारांचे हजेरी पट ठेवले जात नाहीत. तसेच कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात येते, अशी तक्रार मोहता मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी केली. याबाबत माहिती घेऊन यावर तोडगा काढण्याची हमी पालकमंत्र्यांनी दिली. सामान्य रुग्णालयात शल्यचिकित्सकांनी बैठक घ्यावी, अशा सूचना देऊन दिव्यांगांना प्राथमिकतेने सुविधा देणे आपले काम असल्याचे त्यांनी सांगीतले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: प्रत्येक अर्ज स्विकारुन अर्जदारांचे समाधान केले. आलेल्या प्रत्येक अर्जावर संबंधित अधिकाऱ्यांनी 8 दिवसाच्या आत कार्यवाही करुन तक्रारदाराला लेखी कळवावे. एखाद्या नागरिकाचे काम नियमात बसत नसेल तर तसे सुध्दा त्याला लेखी कळवून अर्ज निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Intro:mh_war_04_guirdien_minister_janta_darbar_vis1_7204321

जनतेच्या तक्रारीवर आठवडाभरात कारवाई करा- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

- दुसऱ्या जनसंवाद कार्यक्रमातही शेकडो तक्रारी

वर्धा जिल्ह्यातील बेघरांना घरकुलासाठी पट्टेवाटप, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन, रोजगार यासह विविध समस्यांचे शेकडो अर्ज आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जनतेने प्रत्यक्ष भेटून सादर केले. नियमानूसार असलेल्या प्रत्येक अर्जावर आठवडाभरात कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सुमारे तीन तास पर्यंत पालकमंत्र्यांनी नागरिकांची समस्यांची निवेदने स्वीकारली. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांची टीम उपस्थित होती. या कार्यक्रमात नागरिकांनी दिलेले सर्व निवेदने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी सोपवण्यात आले. ज्या समस्या स्थानिक पातळीवर सुटणार नाही यावर धोरणात्मक विषयांचे अर्ज मुंबई येथे पाठवून त्या समस्यांवर मुंबईत बैठक घेण्याची सूचना ही पालकमंत्र्यांनी बावणकुळे यांनी यावेळी दिल्यात.

ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमण धारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्या तात्काळ निकाली काढावा अशा सूचना दिल्यात.

मोहता मिल मधील अनेक कामगारांचे हजेरी पट ठेवले जात नाहीत. तसेच कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात येते अशी तक्रार मोहता मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी दिली. याबाबत माहिती घेऊन यावर तोडगा काढण्याची हमी त्यांनी दिली. सामान्य रुग्णालयात शल्यचिकित्सक यांनी 26 ला बैठक घ्यावी अशा सूचना देऊन दिव्यांगांना प्राथमिकतेने सुविधा देणे आपले काम असल्याचे त्यांनी सांगीतले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: प्रत्येक अर्ज स्विकारुन अर्जदारांचे समाधान केले. आलेल्या प्रत्येक अर्जावर संबंधित अधिकाऱ्यांनी 8 दिवसाच्या आत कार्यवाही करुन तक्रारदाराला लेखी कळवावे. एखाद्या नागरिकाचे काम नियमात बसत नसेल तर तसे सुध्दा त्याला लेखी कळवून अर्ज निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.