ETV Bharat / state

आपला खासदार गुडगावचा नको वर्ध्याचाच हवा - सुधीर मुनगंटीवार

वर्धा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी नांदगाव खनडेश्वर येथे आज सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती.

सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Apr 6, 2019, 10:14 AM IST

वर्धा - अवघ्या ६० किलोमाटर अंतरावर राहणारे रामदास तडस आपल्या मदतीला धावून येतील की दिल्लीजवळच्या गुडगावला राहणाऱ्या काँग्रेसच्या चारुलता टोकस कामी पडतील, असा सवाल राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. आपल्या विकासासाठी आपला खासदार गुडगावचा नको तर वर्ध्याचाच हवा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना केले.

सुधीर मुनगंटीवार

वर्धा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी नांदगाव खनडेश्वर येथे आज सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार अरुण अडसड, नगराध्यक्ष प्रताप अडसड, नांदगाव खंडेश्वरचे नगराध्यक्ष संजय पोफळे, भाजपचे रविराज देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंद्रे आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, स्थानिक खासदार हवा की बाहेरचा हे गणित लहान मूलही सहज सांगू शकतात. यामुळे रामदास तडस यांना विजयी करून जिह्याचा, राज्याचा आणि देशाच्या विकासाचा विचार करायला हवा. देशाचा पंतप्रधान कोण असावा हे आपल्याला ठरवायचे आहे. देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवादाचा विचार निवडणुकीत व्हायला हवा. भक्कम असे सरकार केवळ मोदी हेच देऊ शकतात हे सर्व मतदारांनी मतपेटीतून व्यक्त करायला हवे.

काँग्रेस खरच गरिबांसोबत असती तर या देशातील गरिबी कधीचीच दूर झाली असती. आता त्यांना सर्वसामान्यांशी काही घेणे देणे नाही, तर त्यांना केवळ सत्ता हवी आहे. इंग्रजांप्रमाणेच काँग्रेसने या देशात फोडा आणि झोडा धोरण अवलंबले. राष्ट्रवादी काँग्रेस हे सुध्दा काँग्रेसचेच पिल्लू आहे. काँग्रेसने धर्माचे तर राष्ट्रवादी काँग्रेसने जातीचे राजकारण केले. भाजपला सत्तेसाठी नाही तर राष्ट्रसेवेसाठी मत हवे आहेत. ज्या घरण्यातुन ३ पंतप्रधान या देशात मिळाले, त्याच घराण्यातील वारसाला आज मतदारसंघ शोधण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, अशी टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Intro:आपला खासदार वर्ध्याचाच हवा गुडगावचा नाही या बतमीसाठी विडिओ

Body:आपला खासदार वर्ध्याचाच हवा गुडगावचा नाही या बतमीसाठी विडिओ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.