ETV Bharat / state

बस न थांबल्याने विद्यार्थी आक्रमक; नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको - students protest on highway

कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केले. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती.

कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको केले. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती.
author img

By

Published : Aug 6, 2019, 5:42 PM IST

Updated : Aug 6, 2019, 8:14 PM IST

वर्धा - कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको केले. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. नागपूर-अमरावती महामार्गावरील गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. यामुळे आज संतप्त विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले. आखेर बस गावात येण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मार्ग सोडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कारंजा तालुक्यातील सावळी बद्रुक फाट्यावर विद्यार्थी कारंजा येथील शाळेत जाण्यासाठी पोहचले. जवळपास 100 विद्यार्थी एकार्जुन गावातून 4 ते 5 किमी पायपीट करत पहाटे फाट्यावर येतात. अनकेदा पहिली बस न थांबता पुढे गेल्यास विद्यार्थ्यांना जवळपास एक ते दोन तास शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.

दोन वर्षांपूर्वी बस गावात जात होती. परंतू, कालांतराने ही बससेवा बंद झाली. त्यामुळे वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला असल्याचे गौरव ठाकरे या विद्यार्थ्याने सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी पंचायत समितीचे सभापती मंगेश खवशी यांना बोलावले. त्यांनी तळेगांव डेपोचे व्यवस्थापक पांडे यांच्याशी संपर्क साधून डेपो मॅनेजरशी चर्चा केली असता सर्वांनी सकाळी व सायंकाळी ६ ला तसेच दुपारी दीड वाजता बस गावात सुरू करण्याची मागणी केली.

या घटनेनंतर डेपो मॅनेजर यांनी सकाळी व संध्याकाळी बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच दुपारी दीडच्या बसचे लवकरच नियोजन करण्याचे सांगितल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Intro:शाळकरी विद्यार्थी बस न थांबल्याने आक्रमक, राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून

वर्धा - कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी चक्क एक जुटीची ताकद दाखवत राष्ट्रीय महामार्ग सहावर रस्ता रोको केला. यामुळें महामार्गवर वाहनांची लांब रांग लागली होती. यामुळे प्रशासनाची चांगलीच खळबळ उडाली. नागपूर अमरावती महामार्गावर असलेले गावातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. यामुळे आज संतप्त विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले. आखेर बस गावात येण्याचा अश्वासनानंतर विद्यार्थ्यांन मार्ग सोडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कारंजा तालुक्यातील सावळी बद्रुक फाट्यावर विद्यार्थी कारंजा येथील शाळेत जाण्यासाठी पोहचले. जवळपास 100 च्या घरात विद्यार्थी असून एकार्जुन या गावातून 4 ते 5 किमी पायपीट करत तर सावळी येथून दीड किलोमीटर अंतर पायदळ पहाटे पासून शिक्षण घेण्यासाठी धडपत फाट्यावर पोहचतात. अनकेदा पहिली बस न थांबता पुढे गेली तर विद्यार्थ्यांना जवपास 1 ते दोन तास शाळेत जाण्यासाठी उशीर होतो. याचा परिमाण त्यांचा अभ्यासक्रम बुडत आहे. दोन तीन वर्षांपूर्वी बस गावात जात होती. पण कालनतराने कारणे देत बस बंद झाली. यामुळें विद्यार्थी वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज राष्ट्रीय मागमार्ग रोखुन धरला असल्याचे गौरव ठाकरे या विद्यार्थ्याने संगीतले.
बाईट - गौरव ठाकरे, विद्यार्थी एकार्जुन कारंजा,

यावेळी विद्यार्थ्यानी पंचायत समितीचे सभापती मंगेश खवशी यांना बोलावले. यावेळी त्यांनी तळेगांव डेपोचे व्यवस्थापक पांडे याना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा केली असता सकाळी 6 वाजता सायंकाळी सहा वाजता आणि दुपारी दीड वाजता बस गावात सुरू करण्याची मागणी लावून धरली. यावेळी आजपासूनच सकाळी संध्याकाळी बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. तर दुपारी दीड वाजताच्या बसचे लवकरच नियोजन करू असे आश्वस्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसने शाळेत सोडून दिले.

जवळपास 1 तास अमरावतीच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद

यावेळी विद्यार्थ्यांनी चक्क शिवशाही असो की ट्रक सर्व व्हॅनसमोर 100च्या वर विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या आंदोलनात जवळपास शाळकरी ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामुळे रोज करावी लागणारी पाच किमीची पायपीट थांबणार आहे. यापूर्वी निवेदन देऊनही मार्ग न काढल्याने मुलांनी आज हे पाऊल उचलले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Aug 6, 2019, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.