वर्धा- सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई-लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते काल (२ सप्टेंबर) पार पडले. गांधी जयंतीचे औचित्य साधून अर्धवट कामे असताना देखील लोकार्पण केल्याचा आरोप भाजपचे आमदार पंकज भोयर आणि खासदार रामदास तडस यांनी केला आहे. तसेच, रीतसर निमंत्रण नासल्याचे सांगत दोन्ही जन प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे.
वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भंगार सहित्यापासून तयार शिल्पाचे आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील जवळपास १६२ कोटींच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. मंजूर कामांचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यात दोन स्क्रॅप शिल्प तसेच शहरातील चौकांचे गांधीयन थीमवर सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. यासह सेवाग्रामचे यात्री निवास, वीआयपी निवसस्थान, पार्किंग व्यवस्था, पवनार येथील धाम नादीच्या तिरावरील मूर्ती विसर्जनाचे काम करण्यात आले आहे. यातले काही कामाचे लोकार्पण झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टाके यानी दिली. पण, सत्ता राहील की नाही, या भीतीपोटी मुख्यमंत्र्यांनी हे लोकार्पण केल्याचा आरोप खासदार तडस यांनी केला.
सेवाग्राम विकास आराखड्यासाठी १ ऑक्टोबर २०१६ ला २६६ कोटी मंजूर करण्यात आले होता. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आराखड्यातील कामांसाठी १४४ कोटी रुपये दिले होते. कामांसाठी विद्यमान राज्य सरकारने एकही रुपया दिलेला नाही. कदाचित सरकार सत्तेत राहते की नाही, या भीतीने घाईत हा सोहोळा घेतल्याचा आरोप तडस यांनी केला.
तसेच, केवळ पत्रिका पाठवण्यात आल्याने रीतसर निमंत्रण नसल्याची नाराजी खासदार तडस यांनी व्यक्त केली. सेवाग्राम विकास आराखड्यातील अनेक कामे अपूर्ण आहे. आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून निधी दिला नाही. पण, श्रेय लाटण्यासाठी कामे अर्धवट असतानाही लोकार्पण करण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार पंकज भोयर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा- वर्धा शहरातील सर्कस ग्राउंड परिसरातून देशी कट्टा जप्त, एकाला अटक