ETV Bharat / state

शेतकरी बँकेच्या दालनात पोहोचले विष घेऊन, कर्ज वसुलीस मुदतवाढ मिळाल्याने शांत

आर्वीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेले कृषी कर्ज सक्तीची केली. यावेळी यंदा पीक न झाल्याने कृषी कर्ज थकले आहे. हफ्ते थकताच इतर कर्ज ज्यामध्ये गृहकर्ज, सोने तारण, ट्रॅक्टर इतर लोन हे नियमित भरत असताना सुद्धा त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवत सक्तीची कर्जवसुली मोहिमेच्या नोटीस दिल्या आहेत.

शेतकरी बँकेच्या दालनात पोहोचले विष घेऊन
author img

By

Published : Nov 5, 2019, 5:49 PM IST

वर्धा - आर्वी येथे स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप हे काही पदाधिकारी आणि शेतकऱ्यांसह विषारी औषध घेऊन बँकेत पोहोचले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, त्यानंतर नागपूर क्षेत्र सहाय्यक प्रबंधक अनिल साटोने यांनी चर्चा करून कर्जवसुलीला मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले. यामुळे प्रकरण चिघळण्याऐवजी थांबले.

शेतकरी बँकेच्या दालनात पोहोचले विष घेऊन

आर्वीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेले कृषी कर्ज सक्तीची केली. यावेळी यंदा पीक न झाल्याने कृषी कर्ज थकले आहे. हफ्ते थकताच इतर कर्ज ज्यामध्ये गृहकर्ज, सोने तारण, ट्रॅक्टर इतर लोन हे नियमित भरत असताना सुद्धा त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवत सक्तीची कर्जवसुली मोहिमेच्या नोटीस दिल्या आहेत. दिवसातून एक फोन यांसह ३ नोटीस बजावण्यात आल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे काहींनी धसका घेतला असून बँक आत्महत्येला प्रवृत्त करत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी शेतजाऱ्यांसोबत जाऊन शेतकऱ्यांच्या परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी अवकाळी पावसाने पीक हाताचे गेले असताना शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे कुठून? असा सवाल केला. तसेच बँक कर्मचारी ग्राहक आणि बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी साटोने यांना समजल्या. त्यांनी शाखा व्यवस्थापक, दीपक नदेश्वर, विकास अधिकारी भूषण गौरखेडे आणि सहाय्यक आशुतोष सोनी यांना समज दिली. तसेच शाखा व्यवस्थापकांनी दालनात लागलेले पडदे काढून थेट लक्ष ठेवल्यास अशा तक्रारी येणार नाही, असेही ते म्हणाले.

अशोक गावंडे यांची ६ एकर शेती आहे. त्यांच्यावर कृषी कर्ज होते. यांना घराचा लिलाव करण्याची धमकी नोटीसमधून देण्यात आली. त्यामुळे त्यांनी धसका घेतला. कृषी कर्ज थकले असले तरी गृह कर्ज नियमित भरत आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक शेतात कुजले आहे. पिकांवर मुद्दल निघत नसताना कर्ज भरावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुढे करावे काय? अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.

Intro:mh_war_prahar_andolan_vis_7204321

कर्ज वसूलीला मुद्गत वाढ, प्रहारचर सोशल फोरमचे आंदोलन

विषारी औषध घेऊन पोहचले शेतकरी बँके मॅनेजरच्या दालनात

- प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी विषारी औषधची बॉटल घेऊन गेले बँकेत

- चर्चेरून मार्ग निघाल्याने विष प्राशन आंदोलन स्थगित

वर्ध्यातील आर्वी येथे स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेकडून सुरु केलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीला मुद्दत वाढ देण्यात आली. यावेळी स्टेट बँकेकडून आडमुठ्या पद्धतीने शेतकऱ्यानवर सक्तीच्या वसुली मोहीम रावबवली जात होती. याच्या विरोधात प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी शेतजाऱ्यां सोबत जाऊन शेतकऱ्यांच्या परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी अवकाळी पावसाने पीक हाताचे गेले असतांना शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे कुठून असा सवाल केला. यावर स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अनिल साटोने मुद्गत वाढ देऊ केल्याने शेतकऱ्यांचा संताप शांत झाला.

वर्ध्यातील आर्वीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेले कृषी कर्ज सक्तीची केली. यावेळी यंदा पीक पाणी न झाल्याने कृषी कर्ज थकले आहे. हफ्ते थकताच इतर कर्ज ज्यामध्ये गृहकर्ज, सोने तारण, ट्रॅक्टर इतर लोन हे नियमित भरत असतांना सुद्धा त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदारा दाखवत सक्तीची वसुली मोहिमेच्या नोटीस दिल्या आहे. यात घर, आदीसह कर्जधारकाची इतर मालमत्ता विकून कृषी कर्ज वसुलीची नोटीस पाठवत एक प्रकारे दंडेली सुरू केली आहे. यात दिवसातून फोन यासह तीन नोटीस बजावण्यात आल्या आहे. यामुळे काहीनी धसका घेतल्याने आत्महत्यला प्रवृत्त करण्याचे काम सुरू आहे.

याचा विरोधात आज प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी काही पदाधिकारीकाऱ्यांसह शेतकऱ्यांना बँकेच्या कृषी शाखेत पोहचले. यावेळी त्यांनी विषारी औषध घेऊन बँकेत पोहचल्याने चांगलीच खळबळ उडाली. यावेळी चर्चा सुरू असताना मात्र वातावरण तापले असताना नागपूर क्षेत्र साह्यक प्रबंधक अनिल साटोने यांनी परिस्थिती एकूण घेतली. शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबवत थोडी मुद्गत वाढ देत असल्याचे बाळा जगताप यांना सांगितले. यामुळे प्रकरण चिघळण्याची ऐवजी थांबले.

यावेळी क्षेत्र प्रबंधक साटोने यांनी बँक कर्मचारी ग्राहक तसेच बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांनाही योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी कळल्या. यावर त्यांनी तोंडी आदेश देत अशा तक्रारी न येण्याची ताकीद दिली. शिवाय शाखा व्यवस्थापक दीपक नदेश्वर, विकास अधिकारी भूषण गौरखेडे आणि सहायक आशुतोष सोनी यांना समज दिली. तर शाखा व्यवस्थापकांना दालनाला लागलेले पडदे काढून थेट लक्ष ठेवल्यास अश्या तक्रारी येणार नाही असा समज वजा सल्ला दिला.

अशोक गावंडे यांची सहा एकर शेती, यांच्यावर कृषी कर्ज होते, यांना घराचा लिलाव करण्याची धमकी नोटीस मधून दिल्यानेत्यांनी धसका खालच्या. कृषी कर्ज थकले असले तरी गृह कर्ज नियमित भरत आहे. मात्र यंदा निसर्गाच्या लहरी पनाणे पीक घरात पोहचले नसून शेतात कुजले अशी परिस्थिती आहे. मुद्दल निघत नसतांना कर्ज भरावे कसा असा प्रश्न उदभवल्याने पुढे काय करावे हा प्रश्न तयार झाला आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.