ETV Bharat / state

तब्बल दोन तास साप बसला चिमुकलीच्या गळ्यात फणा काढून; शेवटी केला दंश

author img

By

Published : Sep 11, 2021, 10:17 PM IST

सेलू येथील बोरखेडी येथील गडकरी कुटुंबातील पद्माकर गडकरी झोपेत असतांना साप फुस्कारण्याचा आवाज आला. आवाजाने त्यांना जाग आली. त्यांनी पत्नीला उठवले, यावेळी दिव्यानी ही झोपली होती

nake sits on girl neck for two hours in washim
तब्बल दोन तास साप बसला चिमुकलीच्या गळ्यात फणा काढून

वर्धा - तब्बल दोन तास चिमुकलीच्या गळ्यात कुंडली मारून बसलेल्या सापाने अखेर दंश केला. काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रकार एक दोन मिनिट नाही तर तब्बल दोन तास चालला. सेलू तालुक्यातील बोरखेडी (कला) येथे मध्यरात्री 12 वाजता सुरू झालेला हा थरकाप उडवणारा प्रकार रात्री 2 वाजता साप मुलीला दंश करूनच गेला. दिव्यानी पद्माकर गडकरी असे सात वर्षीय चिमुकलीचे नाव असून सध्या सेवाग्राम रुग्णलायत उपचार सुरू आहे.

तब्बल दोन तास साप बसला चिमुकलीच्या गळ्यात फणा काढून; शेवटी केला दंश

साप बसला मुलीच्या गळ्यात शेपूट गुंडाळून फणा काढुन

सेलू येथील बोरखेडी येथील गडकरी कुटुंबातील पद्माकर गडकरी झोपेत असतांना साप फुस्कारण्याचा आवाज आला. आवाजाने त्यांना जाग आली. त्यांनी पत्नीला उठवले, यावेळी दिव्यानी ही झोपली होती. तिच्या गळ्यात साप पाहून काय करावे हे पती-पत्नी दोघांना कळणासे झाले. त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना बोलावून सर्पमित्राला बोलावले. पण साप मुलीच्या गळ्यात शेपूट गुंडाळून फणा काढून बसला होता. यावेळी आई वडिलांनी दिव्यानीला हालचाल करण्यास मनाई केली. सात वर्षाच्या चिमुकलीनेही बराच वेळ कुठलीच हालचाल न करता तशीच राहली. प्रत्येक क्षण काळजाचा ठोका चुकवत होता.

चिमुकलीला सेवाग्राम रुग्णालयात केले दाखल -

बघता बघता मध्यरात्री बघ्यांची गर्दी झाली. विषारी साप असल्याने मुलीच्या गळ्यातून त्याला कसे काढावे, या विवंचनेत सर्व जण होते. रात्री 2 वाजताच्या सुमारास दिव्यानीची हालचाल होताच सापाने तिला दंश केला. यावेळी साप दिवानाखाली गेला असल्याने शोध घेतला पण दिसून आला नाही. यावेळी तत्काळ चिमुकलीला सेवाग्राम रुग्णलायत हलवण्यात आले. यात मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने केली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.