वर्धा : जिद्दीला प्रयत्नांची साथ असेल तर काहीही अशक्य आहे, असे म्हणतात. आजकाल तरुण-तरुणी उच्च शिक्षण घेतात. मात्र, नोकऱ्या मिळत नसल्याने ते निराश होऊन चुकीच्या मार्गाला लागतात. तर काही संघर्ष करीत पर्याय निर्माण करुन उंच आकाशी झेप घेतात. अशीच एका तरुणीची गोष्ट आहे. ती उच्च शिक्षित असुनही तीने नोकरी सोडत वेगळा मार्ग निवडला.
नोकरी सोडण्याचे केले धाडस : अशीच कहाणी आहे एका उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणीची. ती वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद ह्या ग्रामीण भागातील तालुक्यामध्ये एका गावात राहते. तीचे नाव शुभांगिनी अजय राजस असे आहे. शुभंगीनीचे शिक्षण एमटेक आयटीमध्ये झालेले आहे. तसेच त्या PHD करत असुन त्यांनी या अगोदर प्राध्यापकाची नोकरी सुद्धा केलेली आहे. परंतु नोकरीमध्ये तीळ मात्र, रस नसलेल्या शुभांगि यांच्या डोक्यामध्ये काहीतरी व्यवसाय करण्याचे चालू होते. अशातच त्यांना एक मुलगी झाली. मुलगी सांभाळून नोकरी करणे त्यांना अवघड जाऊ लागले. परंतु त्यांनी धीर सोडला नाही. आपल्या कामांमध्ये सातत्य ठेवत, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरुवात करायला सुरुवात विचार केला.
व्यवसायाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद : यामध्ये त्यांना त्यांच्या आईने, डॉक्टर असलेल्या भावाने मोठी मदत केली. शुभांगिनी यांना स्वयंपाक करण्यामध्ये जास्त रस असल्याने त्यांनी स्वतःचे आपले यूट्यूब चैनल सुरू केले. त्याच्यावर विदर्भातील प्रसिद्ध व्यंजने जे आधुनिक काळामध्ये लोक पावत चाललेले आहे अशा व्यंजनांना करायला सुरुवात केली. ते व्यंजन नागरिकांपर्यंत पोहोचवायला youtube च्या माध्यमातून सुरुवात केली. यामुळे त्यांच्या या व्यवसायाला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद यायला लागला.
Youtube पासून उत्पन्न : विदर्भात प्रसिद्ध असलेली वांग्याची भाजी तसेच रोडगे तसेच इतर पदार्थ अतिशय चांगल्या तऱ्हेने त्या बनवतात. असे पदार्थ कमी खर्चात, कमी वेळेत कसे करायचे याचे प्रात्यक्षिक त्या आपल्या या चॅनलवर करतात. उच्चशिक्षित असूनही त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केला आहे. आजपर्यंत शुभांगी यांनी 300 च्या वर व्हिडिओ आपल्या youtube चैनलवर अपलोड केले असून त्यापासून त्यांना चांगले इन्कमही सुरू झालेले आहे.
शुभांगी यांची युवकांसाठी प्रेरणादायी : youtube चैनलकडून उत्पन्न सुरू झाल्याने त्यांना चांगलाच हातभार लागला आहे. शुभांगीनि या आपल्या घरीच हे सर्व व्हिडिओ तयार करतात. तसेच आपल्या घरीच सर्व व्हिडिओ त्या अपलोड ही करतात. हे सर्व करत असताना त्या एकट्याच शूटिंगही करतात. विदर्भातील प्रसिद्ध लोक पावत चाललेले पदार्थ त्या आपल्या youtube वर टाकत असतात. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकाही त्यांना नवनवीन पदार्थ करून देण्याची मागणी करत आहेत. उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नसलेल्या तरुण-तरुणीसाठी शुभांगी यांची प्रेरणादायी संघर्ष नक्कीच आदर्श आहे.