ETV Bharat / state

वर्ध्यात ६३ लाखांच्या दारूसह ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

वर्ध्यातील कारंजा टोलनाक्यावरून संशयीत ट्रकच्या तपासणी दरम्यान ६३ लाख रूपयांच्या बाराशे पेट्यांसह ट्रक, असा एकूण ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

आरोपी आणि मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : Aug 12, 2019, 2:23 PM IST

Updated : Aug 12, 2019, 8:03 PM IST

वर्धा - महात्मा गांधीजींच्या नावाने जागतिक स्तरावर ओळख मिळालेल्या जिल्ह्यात सण १९७५ पासून दारू बंदी आहे. यात दारूवर अंकुश लावण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते. पण, पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आदेशानंतर सक्रिय झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या इतिहासतील सर्वात मोठा दारूसाठा जप्त केला आहे. कारंजा टोलनाक्यावरून संशयित ट्रकच्या तपासणी दरम्यान ६३ लाख रूपयांच्या बाराशे पेट्यांसह ट्रक, असा एकूण ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतूक होत आहे.

वर्ध्यात ६३ लाखांच्या दारूसह ८३ लाखांचा मुद्देमाल जप्

वर्धा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागपूरमार्गे दारू जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यासाठी कारंजा येथील टोलनाक्यावर नजर ठेवून असताना एका ट्रकवर पोलिसांना संशय आला. ट्रकमध्ये भुसा असल्याचे सांगण्यात आले. पण, ट्रकचे चाक दबलेला असल्याने नक्कीच वजन जास्त असल्याचा संशयावरून गाडीची पाहणी करण्यात आली. यात उघडपणे भुसा दिसत होता. मात्र, काही पोते हटवत पाहणी करण्यात आली. यावेळी यात दारूच्या पेट्या आढळून आल्या. एक दोन नव्हे तर चक्क १२०० पेट्या विदेशी दारू भुस्याच्या पोत्याआड लपविण्यात आली होती.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या हाती मोठा दारुसाठा लागला. पण, हा दारूचा माल हरियाणा, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीसाठी होता. परंतु, भुसा असल्याचे भासवून अमरावतीच्या अलीकडे हा साठा जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या चौकशीत पुढे आले. नेमकी ही दारू कोणाच्या मालकीची आहे आणि कुठून आली याचा शोध घेण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर आहे.

यातील हा दारुसाठा हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश या २ राज्यात विक्रीसाठी असल्याचे पॅकिंगवर लिखित आहे. यामुळे हा माल दारूबंदी जिल्ह्यात आणून अवैधरित्या विक्री केला जाणार होता की अजून कुठे याचा नेणार होते, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक सुभाष बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील दिलीप वलके, मिलिंद लांबडे, हरिदास सुरजूसे, बंडू घाटूर्ले, शाहू, घुले, बावणे आदींनी कारवाई करत दोघांना गजाआड केले.

ठराविक अंतरानंतर बदलत होता वाहनचालक

वर्ध्याच्या हद्दीत असलेला हा दारूसाठ्याची ज्या ट्रकमध्ये वाहतूक होत होती याचा चालक ठराविक अंतरानंतर बदलत असल्याचे सुद्धा पुढे येत आहे. यामुळे हा नेमका माल कोणाचा याचा शोध घेणे कठीण होणार आहे. भुस्याच्या पोत्यामागे दारूसाठा आणण्याची ही पहिलीच वेळ नक्की नसेल. यामुळे यातील होणारा व्यवसाय कोण आणि केव्हापासून करत आहे. याचा शोध घेणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.

ती पांढरी गाडी कुठे गायब झाली..?

हा ट्रक नागपूरच्या बाहेरून एका ढाब्यावरुन घेऊन निघालेल्या चालकाला अगोदरच दुसऱ्या चालकाने सूचना दिली होती. 'ये ट्रक मत ले जा, इसमे दुसरा माल है' असे सांगून (आर जे १९ जी ए ९५३२) ट्रक घेऊन निघाला. यावेळी या चालकाचा पांढऱ्या रंगाची एक कार पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. यामुळे या प्रकरणात ती कार कोणती हे सुद्धा शोधण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाच्या करमचाऱ्यांना करावा लागणार आहे. अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाला हा ट्रक नागपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या धाब्यावरून पुढे अमरावतीला नेणार होता. यासाठी त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. पण कुठे हे सांगितले नसल्याने याचा शोध घेतला जाणार आहे.

Intro:दारूबंदी जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, 83 लाखाचा दारुसह मुद्देमाल जप्त
- राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
- राष्ट्रीय महारमार्गावर ट्रेलरमधून केली दारु जप्त
- भुसा असल्याचा बनाव करत होत होती दारूची वाहतूक

वर्धा - महात्मा गांधीजींच्या नावाने जागतिक स्तरावर ओळख मिळालेल्या जिल्ह्यात 1975 पासून दारू बंदी आहे. यात दारूवर अंकुश लावण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते. पण पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आदेशानंतर सक्रिय झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या इतिहासतील सर्वात मोठा दारू दारुसाठा जप्त केला आहे. कारंजा टोलनाक्यावरून संशयित ट्रेलचालकाची तपासणी दरम्यान 63 लाखाच्या 1200 पेट्यासह ट्रेलर असा एकूण 83 लाखाचा मुद्देमाल जप्त करत केलेल्या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक होत आहे.

वर्धा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागपूरच्या मार्गे दारू आणि जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यासाठी कारंजा येथील टोलनाक्यावर नजर ठेवून असताना एकावर संशय आला. ट्रेलरमध्ये भुसा असल्याचे सांगण्यात आले. पण यात चाक दबलेला असल्याने नक्कीच वजनदार जास्त असल्याचा संशयावरून गाडीची पाहणी करण्यात आली. यात उघडपणे भुसा दिसत होता. मात्र काही पोते हटवत पाहणी करण्यात आली. यावेळी यात दारूच्या पेट्या आढळून आल्यात. एक दोन नव्हे तर चक्क 1200 पेट्या विदेशी दारू असल्याने भुसा दाखवून वाहतूक केली जात होती.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या हाती मोठा दारुसाठा हाती लागला. पण हा दारूचा माल हा हरियाणा एमपी आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीसाठी होता. परंतु भुसा असल्याचे दाखवून अमरावतीच्या अलीकडे माल जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या चौकशीत पुढे आले. नेमका माल कोणाच्या मालकीचा आहे आणि कुठून आला याचा शोध घेण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर आहे.

ठराविक अंतरानंतर बदलत होता वाहन चालक

वर्ध्याच्या हद्दीत असलेला हा दारूसाठा ज्या ट्रेलरमध्ये वाहतूक होत होता याचा चालक ठराविक अंतरणानंतर बदलत असल्याचे सुद्धा पुढे येत आहे. यामुळे हा नेमका माल कोणाचा याचा शोध घेणे कठीण होणार आहे. धानाचा पोत्यामागे दारूसाठ आणण्याची ही पहिलीच वेळ नक्की नसेल. यामुळे यातील होणारा व्यवसाय कोण आणि केव्हापासून करत आहे. याचा शोध घेणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.

ती पांढरी गाडी कुठे गायब झाली????
हा ट्रक नागपूरच्या बाहेरून एका ढाब्यावरुन घेऊन निघालेल्या चालकाला अगोदरच चालकाने सूचना दिली होती. 'ये ट्रक मत ले जा, इसमे दुसरा माल है' असे सांगून RJ 19 GA 9532 क्रमांकचा ट्रेलर घेऊन निघाला. यावेळी या चालकाचा पांढऱ्या रंगाची एक कार पाठलाग करत असल्याचे सुद्धा समोर आले. यामुळे या प्रकरणात ती कार कोणती हे सुद्धा शोधण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाच्या करमचाऱ्यां करावा लागणार आहे. अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाला हा ट्रक नागरपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या धाब्यावरून पुढे अमरावतीला नेणार होता. यासाठी त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. पण कुठे हे सांगितले नसल्याने याचा शोध घेतला जाणार आहे.

यातील हा दारुसाठा हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यात विक्रीसाठी असल्याचे पॅकिंगवर लिखित आहे. यामुळे हा माल दारूबंदी जिल्ह्यात आणून अवैधरित्या विक्री केला जाणार होता की अजून कुठे याचा शोध घेणे गरजेचे आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक सुभाष बोडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्यासह चम्मूचे दिलीप वलके, मिलिंद लांबडे, हरिदास सुरजूसे, बंडू घाटूर्ले, शाहू, घुले, बावणे आदींनी कारवाई करत दोघांना गजाआड केले.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Aug 12, 2019, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.