ETV Bharat / state

सोशल मीडियावरील भाषेची तोडमोड चिंतेचा विषय - डॉ. सतीश पावडे

आज सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर कमीत कमी शब्द वापरून मराठी भाषेची खिचडी करून ठेवलेली आहे. इंग्रजीच्या नावाने कमीत कमी शब्द वापरत लिखाण होत आहे. हे मराठी भाषेचे नवीन रूप उदयाला येत आहे. भविष्यासाठी ही चिंतेची बाब आहे. इंग्रजीबरोबर मराठीत वाचन लिखाण केले पाहिजे.

नाटककार डॉ. सतीश पावडे
author img

By

Published : Mar 2, 2019, 11:29 AM IST

वर्धा - इंग्रजी वैश्विक भाषा असली तरी मराठी भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये. मराठी ही संवादाची, आत्म संवादाची भाषा आहे. मात्र, आज सोशल मीडियावर भाषेची तोडमोड भविष्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील प्रदर्शन कारी कला विभागाचे प्रभारी प्रमुख आणि नाटककार डॉ. सतीश पावडे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील सेलू येथील यशवंत महाविद्यालयाच्यावतीने आयोजित 'मराठी भाषा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य' या विषयावर ते बोलत होते.

आज सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर कमीत कमी शब्द वापरून मराठी भाषेची खिचडी करून ठेवलेली आहे. इंग्रजीच्या नावाने कमीत कमी शब्द वापरत लिखाण होत आहे. हे मराठी भाषेचे नवीन रूप उदयाला येत आहे. भविष्यासाठी ही चिंतेची बाब आहे. इंग्रजीबरोबर मराठीत वाचन लिखाण केले पाहिजे. आजच्या काळात शुद्ध मराठी टिकून ठेवणे हे मोठे आव्हान असेल, असेही पावडे म्हणाले. यावेळी डॉ. अजय हुमणे आणि डॉ. राजेंद्र मुंडे आदींची उपस्थिती होती.

Intro:R_MH_27_FEB_WARDHA_MARATHI_BHASHA_DIN_VIS_1

मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगू नका- डॉ सतीश पावडे

मराठी समृद्ध भाषा आहे. असे असले तरी मराठी भाषेसोबत इतर भाषा शिकणे तेवढेच महत्त्वाचे आहे. इंग्रजी जरी वैश्विक भाषा असली तरी मराठी भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये. मराठी ही संवादाची, आत्म संवादाची भाषा आहे. कुटुंब मित्र मंडळीत बोलतांना मराठीतच बोलावे. आजच्या काळात शुद्ध मराठी टिकून ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. आज सोशल मीडियावर भाषेची तोडमोड भविष्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे डॉ. सतीश पावडे यानी सांगितले. ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील प्रदर्शन कारी कला विभागाचे प्रभारी प्रमुख आणि नाटककार डॉ. सतीश पावडे आहे.

ते सेलू येथील यशवंत महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'मराठी भाषा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य' या विषयावर बोलत होते.

डॉक्टर पावडे पुढे बोलताना म्हणाले आज सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर कमीत कमी शब्द वापरून मराठी माहिती भाषेची पूर्ण खिचडी करून ठेवलेली आहे. इंग्लिश मिग्लिशच्या नावाने कमीत कमी शब्द वापरात लिखाण होत आहे. हे मराठी भाषेचे नवीन रूप उदयाला येत आहे. भविष्यात ही चिंतेची बाब आहे. इंग्रजी बरोबर मराठीत वाचन लिखाण केलं केले पाहिजे. असेही ते म्हणाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी दिनानिमित्त म्हणी आणि वाक्यप्रचार त्याचा अर्थ सांगत मराठी भाषा दिन साजरा केला. मांचावरील मान्यवरांनी भाषेचं महत्व सांगून पटवून दिले. इंग्रजी जरी व्यापाराची भाषा होत असली तरी संवादाची भाषा म्हणून मराठीही तेवढीच महत्वाची आहे.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अजय अंजली हुमणे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक वसंतराव कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर राजेंद्र मुंडे आदींची उपस्थिती होती

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.